छत्रपती संभाजीनगर : एमबीबीएस, बीडीएसची पहिली फेरी पूर्ण झाल्याने इतर पॅथीच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशफेरीकडे लक्ष लागले होते. अखेर सीईटी सेलने बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) व बीयूएमएस (युनानी) या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी (ग्रुप बी) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता केंद्रीकृत प्रवेशप्रक्रिया (कॅप) फेरी क्रमांक १ व २ चे वेळापत्रक जाहीर केले.
नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या (एनसीआयसीएम) निर्देशानुसार आणि राज्य सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) व बीयूएमएस (युनानी) या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी (ग्रुप बी) ऑनलाइन नोंदणी, नोंदणी फी भरपाई आणि मूळ कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्याची मुदत एक ते चार सप्टेंबर (सकाळी ११.५९ पर्यंत) आहे.
नोंदणीकृत विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, कॅप-१ साठी सीट मॅट्रिक्स आठ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. पसंतीक्रम भरण्याची मुदत आठ ते दहा सप्टेंबर (संध्याकाळी सहापर्यंत) राहील. कॅप-१ निवड यादी १२ सप्टेंबरला जाहीर होईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना १३ ते १७ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात हजेरी लावून आवश्यक कागदपत्रांसह स्टेटस रिटेन्शन फॉर्म सादर करावा लागेल.
Jalgaon News : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला ग्रीन सिग्नल; जळगावात ५० ई-बसेस लवकरच रस्त्यावर दुसरी प्रवेशफेरीकॅप-२ साठी सीट मॅट्रिक्स २७ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल, तर पसंतीक्रम भरण्याची मुदत २९ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर राहील. कॅप-२ निवड यादी चार ऑक्टोबरला जाहीर होईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना पाच ते दहा ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष हजेरीसह कागदपत्रे व शुल्क जमा करावे लागेल. पुढील कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. हे वेळापत्रक एमसीसी, एएसीसीसी, केंद्रीय किंवा राज्य सरकार तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार बदलू शकते, असेही सीईटी सेलने म्हटले आहे.