-शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी काढा
esakal August 29, 2025 01:45 PM

तातडीने ‘फार्मर आयडी’ काढा
अभिजित शेलार ः कोकणकरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी या उपक्रमाचा शेतकऱ्यांना लाभ होणार असून, प्रत्येक शेतकऱ्याने तातडीने फार्मर आयडी काढा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार यांनी केले आहे.
अनेक शेतकरी रोजगार-व्यवसायासाठी मुंबई, पुणे आदी शहरात वास्तव्य करत आहेत. सध्या गणेशोत्सवासाठी ते गावी आले आहेत. त्यामुळे याच काळात शेतकऱ्यांनी आपल्या गावातील शासकीय कार्यालये, सीएससी सेंटर येथे जाऊन फार्मर आयडी काढून घ्यावी, असे शेलार यांनी सांगितले. ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी ही शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे. त्यात शेतकऱ्यांची जमीन, पीक, कुटुंब तसेच शेतीशी निगडित सर्व माहिती समाविष्ट असेल. शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ या एकाच आयडीद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्राममहसूल अधिकारी (तलाठी), कृषीसेवक किंवा साहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.