आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी श्रीलंकेने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
चरिथ असलंका कर्णधार असून, वनिंदू हसरंगा पुनरागमन करणार आहे.
श्रीलंकेचा पहिला सामना १३ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध होईल.
आशिया कप २०२५ स्पर्धेला संयुक्त अरब अमिराती येथे ९ स्पटेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व सहभागी देशांचे संघ जाहीर झाले आहेत. आता गुरुवारी (२८ ऑगस्ट) श्रीलंकेनेही त्यांचा १६ जणांचा संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेत श्रीलंका चरिथ असलंकाच्या नेतृत्वात खेळेल.
Asia Cup 2025: शुभमन गिल आशिया चषक खेळणार का? ब्लड रिपोर्ट समोर आला, सध्या तो कुठेय?श्रीलंकेला आशिया कप स्पर्धेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या संघात स्टार अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाचे पुनराहगमन झाले आहे. त्याला दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्ध २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली होती.
तथापि, आशिया कप स्पर्धेसाठी मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र हसरंगा पहिली फेरी खेळू शकणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. पण जर श्रीलंका सुपर फोरसाठी पात्र ठरला, तर त्यात हसरंगा खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, श्रीलंका संघात स्थान मिळालेले चमिका करुणारत्ने, कामिल मिश्रा आणि नुवानिदू फर्नांडो हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतात. श्रीलंकेला गेल्या काही सामन्यांमध्ये मधल्या फळीची चिंता होती, पण या खेळाडूंकडून आता स्थिरता मिळण्याची अपेक्षा असेल.
श्रीलंकेच्या गोलंदाजी फळीत दुश्मंता चमिरा, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना, महिश तिक्षणा, बिनूरा फर्नांडो हे खेळाडू आहेत. त्यांना वनिंदू हसरंगा आणि दुनिथ वेलालागेकडूनही साथ मिळेल.
श्रीलंकेचा संघ आशिया कपसाठी ब गटात असून त्यांच्यासोबत या गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँग काँग हे संघ आहेत. श्रीलंकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.
Asia Cup 2025: संजू सॅमसनची सलग 50+ धावांची खेळी, वाढवली शुभमन गिलसह गौतम गंभीरची डोकेदुखी आशिया कपसाठी श्रीलंका संघ -चारिथ असलंका (कर्णधार), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पाथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिश्रा, दसुन शनाका, कामिंडू मेंडिस, वानिंदू हसरंगा, नुवानिडू फर्नांडो, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महिश तिक्षाणा, माथिशा पाथिराना, नुआन तुषारा, दुश्मंता चमिरा, बिनुरा फर्नांडो
FAQsआशिया कप २०२५ साठी श्रीलंकेचा कर्णधार कोण आहे?
(Who is the captain of Sri Lanka for Asia Cup 2025?)
➤ चरिथ असलंका हा श्रीलंकेचा कर्णधार असेल.
वनिंदू हसरंगा आशिया कप २०२५ मध्ये खेळणार आहे का?
(Will Wanindu Hasaranga play in Asia Cup 2025?)
➤ हसरंगाचा संघात समावेश झाला आहे, मात्र तो पहिली फेरी खेळेल का हे निश्चित नाही.
श्रीलंकेचा आशिया कप २०२५ मधील पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध आहे?
(Who will Sri Lanka play their first match against in Asia Cup 2025?)
➤ श्रीलंकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध आहे.
श्रीलंका आशिया कप २०२५ मध्ये कोणत्या गटात आहे?
(Which group is Sri Lanka placed in Asia Cup 2025?)
➤ श्रीलंका ब गटात असून त्यांच्या गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत.
श्रीलंकेच्या संघात किती खेळाडूंचा समावेश आहे?
(How many players are included in Sri Lanka’s Asia Cup 2025 squad?)
➤ श्रीलंकेच्या संघात एकूण १६ खेळाडूंचा समावेश आहे.