उद्योग नगरी म्हणून परिचित असलेलं पिंपरी-चिंचवड आता शैक्षणिक नगरी म्हणून उदयाला येत आहे. कारण सध्या अनेक महत्वाच्या शैक्षणिक संस्था इथं असून या संस्थांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच आता व्यवस्थापन क्षेत्रातील एक नामवंत संस्था इथं सुरु होणार आहे. नागपूर IIM (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) चं कॅम्पस इथं होणार आहे. यासाठी जागाही निश्चित झाली आहे. या IIMबाबत मुख्यमंत्र्यांन नवी अपडेट दिली आहे.
Arvind Kejriwal: ट्रम्प भित्रा माणूस त्यामुळं....; केजरीवालांनी मोदी सरकारला दिला भन्नाट सल्ला, आकडेवारीच केली सादरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "आपल्याकडं जे IIM आहेत, अशा देशातल्या संस्थांनी इतरत्रही शाखा काढाव्यात अशी अपेक्षा आहे. त्यानुसार विशेषतः IIM नागपूरनं पिंपरी-चिंचवडमध्ये शाखा काढण्याचं आणि IIM सेट अप करण्याचा एक प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनानं मान्यता दिली असून हळूहळू यातील सर्व मार्ग मोकळे होत आहेत लवकरच त्याचं कॅम्पस तिथे सुरु होईल"
Manoj Jarange: जरांगेंच्या आंदोलनामुळं आझाद मैदानाला छावणीचं स्वरुप! 1000 पोलीस कर्मचारी तैनात, CRPF च्या जवानांनाही पाचारणदरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले आहेत. त्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवा कंदील दाखवला आणि मोशी येथील ७० एकर शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक खासगी कंपन्या आहेत, त्यात रोजगाराच्या दृष्टीनं IIM होणं हे महत्वाचं मानलं जात आहे. विशेषतः राज्यातील तरुणांना यामुळं दर्जेदार शिक्षणाची आणि रोजगाराची संधी देखील मिळणार आहे.
Rahul Gandhi yatra : नेपाळमार्गे तीन दहशतवादी बिहारमध्ये घुसले, राहुल गांधींची यात्रा धोक्यात?औद्योगिक नगरीत आयआयएमची शाखा सुरू झाल्यास रोजगार, संशोधन आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. देशभरातील विद्यार्थी पिंपरी-चिंचवडमध्ये येतील, उद्योगजगताशी थेट संपर्क साधला जाईल आणि शहराची शैक्षणिक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला होता.