केसांच्या समस्या व कारणे
esakal August 29, 2025 01:45 PM

आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक-------लोगो
(२२ ऑगस्ट टुडे ३)

केसगळती हा अगदी लहानथोर स्त्री-पुरुष सर्वांनाच सतावणारा एक प्रश्न आहे. सर्वांची केसगळती ही समान कारणांमुळेच होत नसते तसेच त्यावरील उपचारपद्धतीही वेगवेगळी असते. आज याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया...!

rat२८p६-
P25N87664
- डॉ. बिपिन दाभोळकर, चिपळूण.
---
केसांच्या समस्या, कारणे
त्वचा, केस, नखे हे एकाच संस्थेचे भाग आहेत. हे सर्व जास्तकरून प्रथिनांचे बनलेले असतात. केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिने जास्त प्रमाणात असतात. केसवाढीचे चक्र ज्याला केसांचे कूपचक्र असेही म्हणतात. यातील चार मुख्य टप्पे म्हणजे एनाजेन (वाढीचे टप्पा), कॅटाजेन (संक्रमण), टिलोजेन (विश्रांती) आणि एक्सोजेन (गळणे). प्रत्येक केसाचा कूप स्वतंत्र असतो. त्यामुळे तुमचे सर्व केस एकाचवेळी गळणार नाहीत. एनाजेन टप्प्यात एकावेळी ८० ते ९० टक्के केस असतात. केटाजन टप्प्यात एक टक्का केस असतात तर टिलोजेन टप्प्यात दहा ते पंधरा टक्के केस असतात. शरीरावरील केसांचे स्थान व वैयक्तीक अनुवंश यांसारख्या घटकांवर प्रत्येक टप्प्याची लांबी अवलंबून असते.

* केसगळतीचे प्रकार
- फिजिओलॉजिकल (शरीरक्रिया शास्त्रीय) गळती : सर्वांच्या डोक्यातील एक टक्का केस रोज गळत असतात म्हणजेच रोजचे शंभरपर्यंत केस हे रोज गळत असतात; परंतु ते बऱ्याचदा दिसत नाहीत.
- पुरुषांची केसगळती ः पुरुषांमध्ये टेस्टेटेरॉन संप्रेरके असतात. केसांच्या मुळाशी त्यांचे डीएचटी यात रूपांतर होते. त्यामुळे केसांची वाढ कमी होते व ते गळतात.
- स्त्रियांमधील केसगळती : स्त्रियांमध्येसुद्धा संप्रेरके, मासिक पाळीच्या समस्या, हिमोग्लोबिनचे कमी प्रमाण, प्रथिनांचे कमी सेवन इत्यादी कारणांमुळे केस गळतात.
- टीलोजेन इफ्ल्यूवम : कधी कधी खूप आजारी पडल्यानंतर उदा. टायफाईड, मलेरिया किंवा सर्जरीनंतर, प्रेग्नेंसी, किमोथेरपीनंतर किंवा मोठा मानसिक त्रासानंतर केस अचानक गळू लागतात आणि झुपकॅमध्ये केस जातात. अशावेळी रुग्ण घाबरतात. या आजाराला टीलोजेन इफ्ल्यूवम असं म्हणतात.
- चाई लागणे किंवा ॲलोपिसिया एरियाटा : यामध्ये केसांच्या मुळाशी असलेल्या मेल्यानोसाईटवर पांढऱ्या पेशी आक्रमण करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. त्याबरोबर केसही मारतात व गळतात. त्यामध्ये कधीकधी पांढरे केस वाचतात किंवा नंतर पांढरे केस येऊ शकतात. यामध्ये एलोपेशिया, एरियाटा, टोटलिस व युनिवर्सलिस आदी प्रकार असतात. हा केसांपेक्षा पांढऱ्या पेशींचा ऑटोइम्युन आजार असल्याने याची उपचारपद्धती पूर्णपणे वेगळी असते.
केसांची गळती कमी होण्यासाठी उत्तम प्रथिनयुक्त आहार व सर्वंकष आहार तसेच झोप, योगा तसेच हिमोग्लोबिनची वाढीची औषधे इत्यादींची गरज असते. बदलती जीवनशैली, प्रदूषण, आहारातील बदल यामुळे कमी वयातही केस गळणे, पिकणे इत्यादी नवीन आजार दिसून येत आहेत. प्रत्येक आजाराच्या मुळाशी जाऊन त्यावर उपचार केल्यास या आजारांवर मात नक्कीच करता येईल. यासाठी तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

(लेखक त्वचारोगतज्ज्ञ आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.