मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात दाखल झाले आहेत. ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार आहेत. अवघा एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगे पाटीलांशी चर्चा करणार - आमदार सना मलिकराष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक म्हणाल्या की, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही संपूर्ण विषय समजून घेत त्यावर तोडगा काढत आहोत. सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. माझ्या मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील हे पुढे जात आहे. मी त्यांचे स्वागत केले.
लवकरच जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणारमनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले असून त्यांचा ताफा लवकरच आझाद मैदानात पोहोचणार आहे. आझाद मैदानात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. सीएसएमटी स्थानका परिसरात देखील मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे.
Maratha Reservation : मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकलेमनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज ते आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.