काही गुंडांनी हेड मास्तरची गोळी घालून हत्या केली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रकरण प्रेम प्रकरणाशी संबंधित आहे. मृतकाच्या भावाने हत्येमागे शाळेतल्या शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध कारण असल्याच सांगितलं. शिक्षिकेच्या पतीला संशय होता की, तिचं आणि हेड मास्तरच अफेअर सुरु आहे. म्हणून संशयापोटी त्यानेच हत्या घडवून आणली असं मृतकाच्या भावाने सांगितलं. बिहारच्या दरभंगामधील हे प्रकरण आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
विद्यालय प्रभारी प्रधानाध्यापक आणि बीएलओ राजेश कुमार ठाकूर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी अज्ञात आरोपींनी हे हत्याकांड केलं. खासगी रुग्णालयाच उपचारादरम्यान राजेश कुमार ठाकूर यांचा मृत्यू झाला. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेसोबतच प्रेमसंबंध होते. म्हणून शिक्षिकेच्या पतीवर संशय आहे.
घात लावून हल्ला
दरभंगा जिल्ह्यातील सकतपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील मधपुर टोला सोनपूर येथील प्राथमिक विद्यालयात राजेश कुमार ठाकूर कार्यरत होते. ते शाळेपासून जवळपास 200 मीटर अंतरावर गंगौली वार्ड नंबर 6 चन्ना झा पोखरजवळ पोहोचले, त्यावेळी घात लावलेल्या गुन्हेगारांनी हत्या केली. एका गोळी त्यांच्या छातीत आणि दुसरी पोटात लागली. गोळी लागल्यानंतरही राजेश कुमार यांनी हिम्मत दाखवली. बाइकने ते विद्यालयाकडे गेले. रस्त्यात ते कोसळल्यानंतर सहकारी शिक्षकांना घटनेची माहिती मिळाली. लगेच ग्रामस्थांनी आणि अन्य शिक्षकांनी त्यांना रुग्णालयात नेलं.
गुरुवारी ते नवीन विद्यालय जॉइंन करणार होते
मूळचे मधुबनी जिल्ह्यातील सुगापट्टी गावचे राहणारे राजेश कुमार अविवाहित होते. तीन-चार वर्षांपूर्वी बीपीएससीमधून शिक्षक पदावर त्यांची नियुक्ती झालेली. गुरुवारी ते नवीन विद्यालय जॉइंन करणार होते. नातेवाईकांनी या हत्येमागे प्रेम प्रकरणाचा संशय व्यक्त केलाय.मृतकाच्या भावाने सांगितलं की, शाळेतील एका शिक्षिकेसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. या शिक्षिकेच्या पतीने त्यांना धमकावलेलं.