Viral Video : पाकिस्तानचा जाहीर अपमान! पत्रकाराने अफगाणिस्तानला विचारलेला प्रश्न शेजाऱ्यांना जिव्हारी लागला, कर्णधाराचा चेहरा...
esakal August 30, 2025 06:45 AM
  • पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यातील तिरंगी मालिका आज दुबईत सुरू झाली.

  • मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाची अडचण उघड झाली.

  • मालिकेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

Pakistani Captain’s Awkward Moment As Afghanistan Praised Over Pakistan : पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि अफगाणिस्तान यांच्यात आजपासून तिरंगी मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी तिन्ही संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यात पाकिस्तानची अप्रत्यक्ष लाज काढण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट संघातील सावळागोंधळ सर्वांना माहित आहे आणि त्यामुळेच त्यांची कामगिरी खराब होताना दिसतेय. सतत कर्णधार बदल, मुख्य प्रशिक्षक बदल अशी संगीतखुर्ची सुरूच आहे. पाकिस्तानी चाहते त्यांच्या संघाच्या कामगिरीवर नाराज आहेत आणि संघाची खिल्ली उडवतात.

काल पत्रकार परिषदेत कर्णधार सलमान आगा याच्यासमोर पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवण्यात आली. सलमानसोबत या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा कर्णधार मुहम्मद वसीम देखील उपस्थित होते. तिरंगी मालिकेपूर्वी गुरुवारी दुबई येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिन्ही संघांच्या कर्णधारांनी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी राशिद खानला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी कर्णधाराचा चेहरा पडला.

Asia Cup 2025: २२ षटकार, २१ चौकार अन् २८५ धावा! संजू सॅमसनचा नाद खुळा खेळ; गौतम गंभीरला लागेल वेड

आशिया क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दबदबा आहेच, पण जेव्हा आशियातील दुसरा सर्वोत्तम संघाची चर्चा होते, तेव्हा पाकिस्तान नेहमीच आघाडीवर असल्याचे दिसले आहे. मात्र, हे चित्र आता बदलले आहे आणि अफगाणिस्तानची प्रगती सर्वांना अचंबित करण्यात आली आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेतही पत्रकाराने विचारलेला प्रश्न त्याच संदर्भातला होता.

पत्रकाराने राशिद खानला विचारले की, अफगाणिस्तानचा संघ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आता आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम संघ आहे आणि या मालिकेत तुमचे काय लक्ष्य असेल? पाकिस्तानी कर्णधाराला हा प्रश्न नक्कीच आवडला नाही आणि तो तोंड पडले. त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला ट्रोलही केले जाऊ लागले.

गेल्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघ साखळी फेरीतून बाहेर पडला होता. त्यांना अमेरिकेसारख्या नवीन संघाकडूनही पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यातही त्यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. आज तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानला भिडणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.