Pharmacy Colleges: राज्यातील १७६ फार्मसी महाविद्यालयांना तंत्रशिक्षण मंडळाची नोटीस; महाविद्यालयांच्या त्रुटींवर मंडळाची कारवाई
esakal August 30, 2025 08:45 AM

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने २०२४-२५ शैक्षणिक वर्ष २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये सुरू झालेल्या राज्यातील १२८ औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) ४८ संस्था अशा एकूण १७६ महाविद्यालयांना आवश्यक निकषांची पूर्तता न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील ५५ ‘डी.फार्मसी’, तर पाच ‘बी.फार्मसी’ महाविद्यालयांचा समावेश आहे.

फार्मसी कॉलेजमध्ये पुरेशा भौतिक सुविधा नाहीत, अर्हताधारक प्राध्यापक नाहीत, प्रयोगशाळा नाहीत; तसेच नियमित तासिका होत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी मंत्रालयांपर्यंत पोचल्यावर याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील नव्याने मान्यता मिळालेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका संस्थांची फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकांनुसार तपासणी करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.

यात अनेक संस्थांकडून स्टँडर्ड इन्स्पेक्शन फॉरमॅटमधील अनिवार्य बाबींची पूर्तता झालेली नसल्याचे आढळून आले. त्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. तसेच त्रुटी दूर होईपर्यंत प्रवेश रोखण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील २० महाविद्यालये

तंत्रशिक्षण मंडळाने राज्यातील १२८ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील पदविकेच्या ५५ महाविद्यालयांचा समावेश आहे. या विभागात मराठवाड्यासह अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव असे जिल्हे येतात. यात मराठवाड्यातील १५ महाविद्यालयांचा समावेश आहे. पदवीसाठी नाशिक वेगळा आहे. या विभागातील सर्वाधिक म्हणजे १४ संस्थांचा यात समावेश आहे. मराठवाड्यातील पाच पदवी महाविद्यालयांना नोटीस देण्यात आली.

विभागातील संस्था

  • १४१

  • डी.फार्मसी संस्था

  • ८,५२०

  • प्रवेश क्षमता

  • १०२

  • बी.फार्मसी संस्था

  • ८,३४०

  • प्रवेश क्षमता

Chh. Sambhajinagar: मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर तडाखा; अनेक गाड्या रद्द, काही मार्ग बदलून धावल्या

फार्मसी पदवी, पदविका प्रवेशासाठी नोंदणी सुरू आहे. अद्याप प्रवेशफेरी जाहीर झालेल्या नाहीत. त्यापूर्वी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस दिल्या. त्रुटीपूर्तीत केल्याशिवाय या महाविद्यालयांना यावर्षी प्रवेशप्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार नाही.

- डॉ. किरण लाढाणे, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर

‘बी.फार्मसी’च्या या महाविद्यालयांना नोटीस

  • मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, निपाणी

  • आर.जी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, औराळा, ता. कन्नड

  • जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी, दापका, ता. निलंगा

  • महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स, लातूर

  • सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर

‘डी.फार्मसी’च्या या महाविद्यालयांना नोटीस

जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा रमेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, खांडगाव, नायगाव सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नांदेड माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, मुरूम, उमरगा देशमुख कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा ॲड. तुषार गवळी कॉलेज ऑफ फार्मसी, जालना एस.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, पाटोदा जे.के. कॉलेज ऑफ फार्मसी, हिंगोली बोर्डीकर कॉलेज ऑफ फार्मसी, सेलू व्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सोनपेठ, परभणी श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी, कन्नड अरमान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर कै. ज्ञानदेव पाटील ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर आर.जी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कन्नड पद्मावती कॉलेज ऑफ डी.फार्मसी, छत्रपती संभाजीनगर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.