शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
esakal August 30, 2025 12:45 PM

rat२९p६.jpg-
२५N८७८६७
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे सत्कार करण्यात आलेले शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी. सोबत प्रमुख पाहुणे सुधीर करमरकर, डॉ. संतोष बेडेकर, राधिका वैद्य आदी.
----
चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळातर्फे पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. नगरपालिकेच्या शाळा क्र. १३ मधील प्राथमिक शिक्षक सुधीर करमरकर यांच्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा मंडळातर्फे सतत १५ वर्षे आयोजित करत असल्याची माहिती कोषाध्यक्ष राधिका वैद्य यांनी दिली. पाचवीमधील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी श्रावणी सरपोतदार, स्वरा जोशी (दामले विद्यालय); राघव पाध्ये, चैताली कुलकर्णी, अनन्या जोशी (जीजीपीएस); मुमुक्षा वझे, गार्गी देवल, स्पृहा भावे, मिहीर खाडिलकर (फाटक हायस्कूल); आभा घारपुरे, इंद्रनील आठल्ये, वल्लरी मुकादम (पटवर्धन हायस्कूल); अत्रेय देवस्थळी (शिर्के हायस्कूल) यांना गौरवण्यात आले. आठवीमधील आर्या पाध्ये (दामले विद्यालय); आर्या जोशी, आभा भाटवडेकर, देवांशी चौघुले, दिशा घाणेकर, हर्ष पराडकर, स्वराली कुलकर्णी (जीजीपीएस); नील देशपांडे, आर्य दांडेकर, सिद्धी मोडक, अवनी परांजपे, चिन्मय फडके, मोहित टिकेकर, ईश्वरी खाडिलकर, तपस्या बोरकर (फाटक हायस्कूल); आदित्य दामले आणि अंतरा रायकर (पटवर्धन हायस्कूल) यांना सन्मानित करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.