रिल्स बनवण्यास केला विरोध, तर पत्नी चाकू घेऊन पतीच्या मागे लागली…
Tv9 Marathi August 30, 2025 06:45 PM

इंस्टाग्रामवर सातत्याने आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणाऱ्या पत्नीला हटकल्याने पत्नीने चाकू घेऊन आपला पाठलाग केला आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप एका पीडीत पतीने केला आहे. पतीने दावा केला आहे की त्याची पत्नी इंस्टाग्रामवर अश्लिल रिल्स बनवते आणि तिचे परपुरुषांशी संबंध असून घरकामही करत नसल्याचे पतीने म्हटले आहे.

गाझियाबादच्या लोनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. लोनी येथील अशोक विहार परिसरातील रहिवासी अनिस यांनी त्याच्या पत्नी इशरतवर गंभीर आरोप केले आहेत. अनिसचे म्हणणे आहे की त्याची पत्नी इंस्टाग्रामवर अश्लिल रिल्स तयार करते. जेव्हा तिला या संदर्भात विरोध केला तेव्हा त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अनिस यांनी केला आहे.

पत्नीने आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचा अनिस याचा आरोप आहे. ज्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. पतीने हे व्हिडीओ फूटेज पोलिसांना सोपवले आहेत. अनिस याने सांगितले की पत्नीचे असे वागणे खूप काळापासून सुरु आहे. तिचे अन्य पुरुषांशी संबंध आहेत आणि बराच वेळ ती सोशल मीडियावर घालवत असते. घरातील कोणतेही काम करीत नाही. आणि रोखल्यानंतर आक्रमक होते. पत्नी आत्महत्येची धमकी देऊन मला आणि माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. माहेरचे लोकही तिलाच साथ देत असून आमच्यावर दबाव टाकत असल्याचे पती अनिस याने म्हटले आहे.

पोलिसांना बोलावून आपल्यावर आरोप केल्याचे पती अनिस याने सांगितले. ज्यामुळे आपल्याला जेलमध्ये जावे लागले. आता परिस्थिती अशी आहे की मी माझ्याच घरात बेघर झालो आहे. पत्नी आणि तिचे नातेवाईक सातत्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याच्या धमक्या देत आहेत.

एसीपी सिद्धार्थ गौतम यांनी या संदर्भात सांगितले की २८ ऑगस्ट रोजी अनिस याच्या तक्रारीवरुन लोनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीने दिलेल्या व्हिडीओत चाकूने हल्ला करणे आणि धमकी देण्याची घटना स्वच्छ दिसत आहेत. या प्रकरणातील ज्या सर्व बाजूंची चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील तथ्य जाणून घेऊन कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.