- rat२८p७.jpg-
P२५N८७६६५
रत्नागिरी ः पतपेढी सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष संतोष कांबळे. सोबत पतपेढी संचालक व पदाधिकारी.
सभासदांसाठी कल्याणकारी योजना
प्राथमिक शिक्षक पतपेढी; सर्वसाधारण सभेत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जाकादेवी, ता. २९ ः रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असून, सभासदांच्या हितासाठी कल्याणकारी योजनाही राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पतपेढीच्या सभेत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी जाहीर केले.
रत्नागिरीतील बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेला अध्यक्ष संतोष कांबळे, उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक मनेष शिंदे, अशोक मळेकर, राजेंद्र चंदिवडे, अमोल भोबस्कर, रमेश गोताड, चंद्रकांत कोकरे, संजय डांगे, विजय खांडेकर, सुनील दळवी, चंद्रकांत झगडे, गुलजार डोंगरकर, प्रांजली धामापूरकर, संतोष कदम, अंकुश चांगण आदी उपस्थित होते. या प्रसंगी कांबळे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यानंतर जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना आणण्याचे धोरण यावर्षी निश्चित केले गेले.