अहिल्यानगर: जिल्ह्यातील दहा हजार ३३१ नागरिकांनी पोलिसांना त्यांच्या कामगिरीबाबत सल्ला दिला आहे. ज्यांनी हा अभिप्राय दिला त्यापैकी ७० टक्के नागरिक पोलिसांच्या कामगिरीबाबत असमाधानी आहेत. विशेष म्हणजे दारू, जुगार व अंमली पदार्थ या अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करण्याचा सल्ला देखील नागरिकांनी दिला आहे, तसेच चांगले काम करणाऱ्या पोलिस ठाण्यांमध्ये नगर तालुका पोलिसांना नागरिकांनी पहिल्या क्रमांकाचे गुण दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी दिलेला हा फिडबॅक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानुसार आम्ही आमच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले आहे.
Ajit Pawar: मेळाव्याने राष्ट्रवादीला मिळणार नवी ऊर्जा?; अजित पवारांच्या मेळाव्याकडे लक्ष, डिंभे-माणिकडोह बोगदा इतर मुद्दे महत्त्वाचेघार्गे यांनी अहिल्यानगरचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या महिनाभरातच ‘नगरकरांनो, आता तुम्हीच सांगा, आम्ही कसे आहोत’ ही ऑनलाइन फिडबॅक नोंदविणारी मोहीम राबविली होती होती. त्यासाठी क्यू आर कोड देण्यात आला होता. यामध्ये वाहतूक, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि पोलिसांची वागणूक अशा मुद्द्यांवर मत नोंदवली गेली होती. जिल्ह्यात दहा हजार ३३१ नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. त्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तसेच सायबर गुन्ह्यांबाबत देखील मोठ्या प्रमाणात अभिप्राय आलेले आहेत. वाहतूक कोंडीबाबत एक हजार ९९१ अभिप्राय, नार्कोटिक्सबाबत दोन हजार ७४, महिला सुरक्षेबाबत एक हजार ९९८, सायबर गुन्ह्यांबाबत एक हजार ८१५, तर इतर बाबींवर दोन हजार ४५३ अभिप्राय नागरिकांनी दिले आहेत. या अभिप्रायासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण देखील देण्यात आले आहेत. त्यात नगर तालुका पोलिस ठाणे अव्वल क्रमांकावर, तर कोतवाली पोलिस दुसऱ्या स्थानी आहेत.
‘ड्रग्ज फ्री पोलिस ठाणे हवेजिल्ह्यात गांजा, इंजेक्शनसारख्या प्रकारातून अंमली पदार्थ तस्करी पुढे येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अंमली पदार्थ प्रकरणात दोषी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याच्या सूचना केल्या आहेत. अगदी एसपींसाठीही हा आदेश लागू असल्याचे पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले, तसेच ‘ड्रग्स फ्री’ पोलिस ठाणे करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांचे कौतुक करणाऱ्या अभिप्रायापेक्षा नागरिकांनी निर्भीडपणे समोर येऊन पोलिसांना केलेल्या सूचना, दाखवलेल्या त्रुटी, केलेली कठोर टीका, गंभीर तक्रारी याकडे गांभीर्याने पाहिले. यातून आमच्या कार्याला दिशा देणारी प्रेरणा मिळाली, यातून पोलिस दल अधिक प्रभावी, उत्तरदायी आणि तंत्रस्नेही होण्याच्या दिशेने प्रयत्न करू.
- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक.
काय म्हणतात नागरिकआपल्या परिसरातील व्यसन बंद झाले पाहिजे. त्यामुळे आपल्या परिसरातील महिला सुरक्षित व ठीक राहतील. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही. म्हणून आपल्या परिसरातील दारू, सिगारेट, मावा, गांजा व इतर सर्व अंमली पदार्थ बंद करावेत.
- दिव्या, राहुरी
Maratha Reservation: 'भरपावसात मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी'; शेंडी, नेप्ती चौफुला येथे समर्थकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागतएक पालक म्हणून मला माझ्या मुलीला कॉलेजला पाठविताना भीती वाटते. शहरात मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करा, हीच विनंती. कॉलेज परिसरात अनेक मुले हे मुलींना त्रास देतात
- अनामिक, संगमनेर