मुंबई : आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे दाखल झाले.माजी न्या. शिंदे यांनी कुणबी नोंदी किती सापडल्या यासंदर्भातील माहिती दिली. शिंदे समितीनं 13 महिने अभ्यास केला आता मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. 2 लाख 39 हजार प्रमाणपत्र मान्य केल्याची माहिती देखील न्या. शिंदे यांनी मनोज जरांगे यांना दिली.
शिंदे समितीनं 13 महिने अभ्यास केला, आता मराठवाड्यातील मराठा कुणबी असा अहवाल द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. 58 लाख नोंदी हा कुणबी आणि मराठा एकच असल्या पुरावा आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
सरसकट मराठे कुणबी ठरत नाहीत तर ओबीसीत जात सरसकट कशी जाते,असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. अर्धे मराठे कुणबी,अर्धे मराठे मराठा कसे, असा सवाल जरांगे यांनी केला. अर्धा पश्चिम महाराष्ट्र,अर्धा मराठवाडा कुणबी आहे. कोकणातले मराठे,पठार भाग मराठा आहे. तर खानदेश,विदर्भातले मराठा कुणबी आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
58 लाख नोंदी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा पुरावा आहे. मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढावा, जीआर काढल्याशिवाय मी हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर काढायला मुदत देणार नाही, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 लाख 23 हजार कुणबी होते ते कुठं गेले? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. बीडजालना जिल्ह्यातील कुणबी कुठं गेले, असा सवाल मनोज जरांगेंनी केला.
आतापर्यंत मराठवाड्यात 2 लाख 47 हजार नोंदी मिळाल्या नोंदी मिळालेल्यांपैकी 2 लाख 39 हजारांना प्रमाणपत्रे दिले. संपूर्ण महाराष्ट्रात 58 लाख नोंदी मिळाल्या. संपूर्ण महाराष्ट्रात 10 लाख 35 हजार प्रमाणपत्रे दिली आहेत. गॅझेटियर लागू करणार, पण कोणत्या संदर्भात ते अजून ठरायचं आहे. अभ्यास करुन गॅझेटियरचं कायद्यात रुपांतर करावं लागेल,गॅझेटियरसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असं न्या. संदीप शिंदे म्हणाले.
जातीचा दाखला व्यक्तीला मिळेल,सरसकट समाजाला नाही, अशी माहिती देखील न्या.शिंदे यांनी दिली. सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही. मराठवाड्यातले मराठे कुणबी हे तत्वतः मान्य असल्याचं न्या.शिंदे यांनी म्हटलं.
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियरने अंमलात आणले …साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
https://www.youtube.com/watch?v=kce-xglml0e
आणखी वाचा