Maratha Reservation: एक हाक अन् हजारो भाकऱ्यांची रसद..! 'कऱ्हाड शहरासह तालुक्याची मुंबईतील आंदोलनकर्त्यांसाठी धाव'; टेंपोभर साहित्य रवाना
esakal September 01, 2025 02:45 AM

कऱ्हाड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनात राज्यभरातून सहभागी झालेल्या आंदोलकांना शुक्रवारी जेवण- पाणी न मिळाल्याने मोठे हाल झाले. त्याचा विचार करून कऱ्हाड शहरासह तालुक्यातील मराठा बांधवांनी आवाहन करताच, आज २५ हजारांवर भाकरी-चपात्या, पाण्याच्या बाटल्या, द्रोण-पत्रावळ्या, जेवणासाठी लागणारे साहित्य जमा झाले, तर येथील दत्त चौकातून संबंधित जेवण, रसद आंदोलनकर्त्यांसाठी मुंबईला रवानाही केले.

Satara News: 'कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई; तळबीड पोलिसांचा इशारा; संचलनाद्वारे शांतता, सुरक्षेचा दिला संदेश

आंदोलनासाठी गेलेल्या मराठा आंदोलनकर्त्या बांधवांची काल मुंबईत मोठी गैरसोय झाली. त्याची तातडीने दखल घेत येथील समन्वयकांनी आज दुपारी आंदोलनकर्त्या बांधवांसाठी भाकरी, जेवणाचे साहित्य जमा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला शहरासह तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.

नारायणवाडीच्या मंडळाकडून महाप्रसाद रद्द

नारायणवाडी येथील दत्ताजी खुडे यांनी त्यांच्या गावातील लोकांना मुंबईतील मराठा बांधवांसाठी जेवण जमा करण्याची माहिती मिळावी, यासाठी स्टेट्स ठेवले होते. ते बघून हनुमान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महाप्रसाद रद्द करून ते साहित्य आंदोलनकर्त्यांना पाठवण्यात येणार आहे.

Satara News:...अखेर सापडले शिक्षकाचे कुटुंब; गोंदवलेतील मंदिरात मुक्काम, ४० तास केली शोधाशोध गावागावांतून प्रतिसाद

मुंबईतील मराठा बांधवांसाठी जेवण व जेवणाचे साहित्य जमा करण्याच्या मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला तालुक्यातील गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळाला. गावागावांतून चारचाकी गाड्या भरून भाकरी-चपाती, जेवणाचे साहित्य जमा होत होते. अनेक महिला, युवक-युवती भाकरी-चपाती आणून जमा करत होत्या. त्यामुळे येथील दत्त चौकात मोठ ट्रक लावून साहित्य मुंबईकडे रवाना करावे लागले. त्यामुळे मराठा समन्वयकांनी समाधान व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.