गणरायाला फुलांच्या सजावटीचा सुगंध
esakal September 01, 2025 07:45 AM

तळेगाव दाभाडे, ता. ३१ : कामशेत शहरात यावर्षी १६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या वर्षी बहुतेक मंडळांनी सामाजिक, धार्मिक, कार्यक्रमांवर भर दिला आहे. कामशेत शहर सुवासिक तांदळासाठी राज्यात प्रसिद्ध असून, अनेक मंडळांनी सुवासिक मोगरा फुलांची सजावट सजावट केल्याने परिसर सुगंधी झाला आहे.
ओम समर्थ मित्र मंडळ गावठाण हा मानाचा पहिला गणपती असून अध्यक्ष शंकर बाळासाहेब शिंदे आहेत. गेल्या बारा वर्षांपासून अथर्वशीर्ष पठण आयोजित केले जाते. यात दरवर्षी महिलांची उपस्थित लक्षणीय असते. यासह विविध धार्मिक कार्यक्रमही घेतले जातात.
नाणे रस्ता परिसरातील धर्मवीर संभाजी महाराज मित्रमंडळाचे यंदा १९ वे वर्ष असून अध्यक्ष नितीश धनवे आहेत. मंडळाने यावर्षी उज्जैन महाकाल देखावा केला आहे. तर, ननावरे मित्रमंडळाने महालक्षमी मंदिराचा देखावा केला आहे.
गणेश सहकार मित्रमंडळ बाजारपेठ मंडळाचे ८० वे वर्ष असून खर्चाला फाटा देत दरवर्षी अडीच ते तीन हजार नागरिकांना अन्नदान केले जाते. श्रीशूर समर्थ मित्रमंडळाचे ३३ वे वर्ष असून अध्यक्ष अमोल पवार आहेत. तेथे श्रींच्या मूर्तीभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे.
नवयुग मित्रमंडळाचे यावर्षी २४ वे वर्ष असून कमलेश तारू हे अध्यक्ष आहेत. त्यांनी दिवेघाटाचा देखावा केला आहे.
शिवप्रेरणा मित्र मंडळ छावा चौक अध्यक्ष सुजीत धावडे असून काळभैरव हा देखावा केला आहे. अष्टविनायक मित्र मंडळ १८ वे वर्ष साजरे करत असून सौरभ वाळुंज अध्यक्ष आहेत. त्यांनी बारा ज्योर्तिलिंगांचा देखावा केला आहे. भोईआळी येथील शिवशंभो मित्रमंडळाचे यावर्षी ४० वे वर्ष असून दतात्रय ढगे हे अध्यक्ष आहेत. मंडळाने येथे ‘फुलांची झोपडी’ देखावा केला आहे. सह्याद्री मित्रमंडळाचे ३५ वे वर्ष असून ध्रुव वंजारी हे अध्यक्ष आहेत. फुलांची सजावट केली आहे. गणेश मित्रमंडळाचे बारावे वर्ष असून आदित्य सावंत अध्यक्ष आहेत. त्यांनी विठ्ठल मंदिर देखावा केला आहे. अष्टविनायक मित्र मंडळ यावर्षी सतरावे वर्ष साजरे असून सिद्धार्थ लोखंडे अध्यक्ष आहेत. दौंडे कॉलनीतील शिवशक्ती मित्र मंडळाचे यंदा दहावे वर्ष असून रमेश जगनाडे हे अध्यक्ष आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.