swt3110.jpg
88386
वेंगुर्लेः आमदार किरण सामंत यांचा सत्कार करताना कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांना संधी द्यावी
किरण सामंतः ‘कुडाळदेशकर’तर्फे वेंगुर्लेत सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः समाजाच्या प्रगतीसाठी तरुण पिढीला संधी देणे अत्यावश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच समाज उन्नतीचा मार्ग खुला होतो, असे प्रतिपादन राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी केले.
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने श्री. सामंत यांचा वेंगुर्ले येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी रविंद्र उर्फ अण्णा सामंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत देसाई, खजिनदार प्रफुल्ल वालावलकर, मनोज वालावलकर, सचिन वालावलकर, ओंकार देसाई, विनय सामंत, नुपूर सामंत, गुरु देसाई, प्रणव प्रभू, अमित तेंडोलकर, वरुण वालावलकर, अभय वालावलकर, अनिकेत वालावलकर, ओंकार वालावलकर, सागर नाईक, गौरव प्रभू आदी ज्ञाती बांधव उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानतर्फे ज्ञाती बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच कुडाळ येथे नोव्हेंबरमध्ये केपीएलच्या दहाव्या पर्वाच्या नियोजनाची तसेच तेथे उभारण्यात येणाऱ्या कुडाळदेशकर भवनाची संपूर्ण माहिती देण्यात आली. सामंत यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे व उपक्रमांचे कौतुक करताना, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद केले. तसेच, युवा पिढीच्या पुढाकारामुळे प्रतिष्ठान कार्यक्षेत्र अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.