लवकरच सुरू होतोय फ्लिपकार्ट Big Billion Days सेल; खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर
esakal September 01, 2025 07:45 AM

Flipkart Big Billion Days Sale Offers : फ्लिपकार्टचा बहुप्रतीक्षित बिग बिलियन डेज सेल यंदा दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात धमाकेदार ऑफर्स घेऊन येत आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या सेलमध्ये सॅमसंग, अॅपल, रियलमी, मोटोरोला यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केवळ स्मार्टफोन्सच नाही तर स्मार्ट टीव्ही, एसी आणि रेफ्रिजरेटर्ससारख्या घरगुती उपकरणांवरही बंपर सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्टने या सेलसाठी खास मायक्रोसाइट तयार केली असून यंदाचा सेल गेल्या वर्षीपेक्षा मोठा आणि भव्य असेल असा दावा कंपनीने केला आहे. स्मार्टफोनप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. यंदा सॅमसंग गॅलक्सी S25 सिरीजवर मोठी सूट अपेक्षित आहे ज्यामुळे या मालिकेतील सर्व मॉडेल्स आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतात. तसेच सॅमसंग गॅलक्सी S25 FE वरही आकर्षक ऑफर्स असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S24 मोबाईलवर चक्क 25 हजारचा डिस्काउंट; वर्षातली सर्वात मोठी सूट, ऑफर पाहा एका क्लिकवर

अॅपलच्या चाहत्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. अॅपल आयफोन 17 सिरीज लाँच होण्यापूर्वी आयफोन 16 सिरीजवर मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन 15 आणि आयफोन 14 च्या जुन्या मॉडेल्सवरही स्टॉक क्लिअर करण्यासाठी जबरदस्त ऑफर्स असतील. मोटोरोला, रियलमी, इनफिनिक्स, शाओमी आणि टेक्नोसारख्या ब्रँड्सचे बजेट आणि मिडरेंज स्मार्टफोन्सही कमी किंमतीत EMI पर्यायांसह आणि एक्सचेंज ऑफर्ससह उपलब्ध होतील.

eSIM Fraud : नवीन सिमकार्ड खरेदी करताय? तुमच्यासोबतही होऊ शकतो मोठा फ्रॉड, देशभरात टेन्शन, नेमका विषय जाणून घ्या

फ्लिपकार्टने अद्याप डिस्काउंट्सची यादी जाहीर केलेली नाही परंतु या सेलची उत्सुकता ग्राहकांमध्ये वाढत आहे. सणासुदीच्या काळात खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फ्लिपकार्टचा हा सेल नक्कीच एक उत्तम संधी ठरेल. तयार राहा कारण बिग बिलियन डेज सेल लवकरच येत आहे

FAQs
  • When does Flipkart's Big Billion Days Sale start?
    फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल कधी सुरू होतो?

    Answer: सेलची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण तो दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सुरू होईल.

  • Which smartphone brands will offer discounts in the sale?
    सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन ब्रँड्सवर सूट मिळेल?

    सॅमसंग, अॅपल, रियलमी, मोटोरोला, शाओमी, इनफिनिक्स आणि टेक्नोसारख्या ब्रँड्सवर सूट मिळेल.

  • Will there be discounts on home appliances during the sale?
    सेलमध्ये घरगुती उपकरणांवर सूट मिळेल का?

    होय, स्मार्ट टीव्ही, एसी, आणि रेफ्रिजरेटर्ससारख्या उपकरणांवर मोठ्या सवलती असतील.

  • Are there any special offers on the iPhone 16 series?
    आयफोन 16 सिरीजवर विशेष ऑफर्स असतील का?

    आयफोन 16 सिरीजवर मोठी सूट अपेक्षित आहे, विशेषतः आयफोन 17 लाँचपूर्वी.

  • Can I get EMI or exchange offers during the Big Billion Days Sale?
    बिग बिलियन डेज सेलमध्ये EMI किंवा एक्सचेंज ऑफर्स मिळतील का?

    होय, सेलमध्ये EMI पर्याय आणि एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध असतील.

  • © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.