वायूसेनेला लवकरच मिळणार दोन तेजस मार्क-1 ए जेट फायटर, पाहा काय योजना
Tv9 Marathi September 01, 2025 02:45 AM

भारतीय वायूसेनेला सप्टेंबर महिन्यात दोन तेजस मार्क-1 ए मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)भारतीय वायूसेनेला दोन तेजस मार्क 1 ए लढावू विमाने देऊ शकते असे भारताचे संरक्षण सचिव आर.के.सिंह यांनी सांगितले. या विमानांना वेपन्स इंटीग्रेशन म्हणजे शस्रास्रे जोडण्यात आली आहे. यावेळी आर.के.सिंह यांनी सांगितले की सरकार HAL बरोबर 97 आणखी तेजस खरेदी करण्याचा करार करणार आहे. ज्याची अंदाजित किंमत 67,000 कोटी रुपये आहे. सध्या 38 तेजस जेट फायटर विमाने वायूसेनेत सामील आहेत.

याआधी न्यूज एजन्सी एएनआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी भारतीय वायूसेनेसाठी ( IAF)97 LCA मार्क 1A फायटर जेट खरेदी करण्यासाठी 62 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली होती.
वास्तविक फेब्रुवारी 2021मध्ये सरकारने HAL सोबत 83 तेजस मार्क -1 ए खरेदीसाठी 48,000 कोटींचा करार केलेला होता. परंतू HAL ला अमेरिकन इंजिन डीलिव्हरी होण्यास उशीर झाल्याने आतापर्यंत एकही विमान सोपवलेले नाही. परंतू आशा निर्माण झाली आहे की साल 2028 पर्यंत HAL सर्व विमाने वायूसेनेला सोपवणार आहे.

LCA मार्क 1A तेजस एअरक्राफ्टचे एडव्हान्स व्हर्जन आहे. या अपग्रेडेड एवियॉनिक्स आणि रडार सिस्टीम लावलेली आहे. LCA मार्क-1A चे 65 टक्के उपकरणं भारतात तयार झालेली आहेत. तेजसला देखील HAL ने विकसित केले आहे. हे सिंगल इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे.

HALच्या जवळ 83 एअरक्राफ्ट्सची डीलिव्हरी करण्यासाठी 2028 पर्यंतचा वेळ आहे. HALचे चेअरमन आणि मॅनेजमेंट संचालक डी.के सुनील यांनी सांगितले की डिलिव्हरीला झालेल्या उशीर यामागे इंडस्ट्रीला जबाबदार धरले जात होते. परंतू या दिरंगाईला तांत्रिक त्रूटी जबाबदार आहे. यास आता दूर केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंगळुरुत तेजस फायटर प्लेनमध्ये 25 नोव्हेंबर 2022 मध्ये उड्डान घेतले होते. कोणाही भारतीय पंतप्रधानांनी तेजसमधून घेतलेले हे पहिले उड्डाण आहे. तेजसमधून उड्डाण भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरु स्थित हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) ला भेट दिली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.