मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांनी पडळकरांना डिवचलं
Marathi August 31, 2025 02:25 AM

जयंत पाटील: मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, अस वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांना डिवचलं आहे. ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा, असे जयंत पाटील यांनी म्हटलंआहे. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे असंही पाटील म्हणाले.

ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा

मुद्दा वोट चोरीचा असून ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा असं जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिलं आहे. मी मंगळसूत्र चोराविरोधात लढत नाही असं म्हणत जयंत पाटील यांची पडळकर यांना कोपरखळी लगावली आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता एक महिनाभर हे चालेल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. मत चोरीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा टोला

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर टीका करत होते. त्यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार जयंत पाटील यांनी आपल्याकडील प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगितले होते. तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वाळवा तालुका सहजा सहजी झुकत नाही, असेही वक्तव्य केलं होतं. ज्याची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतला होता. ‘जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहेत. ते म्हणतात तसे सांगली जिल्हा, वाळवा तालुका कधी झुकत नाही, जे बरोबर आहे. पण जयंत पाटील हा झुकत नाही, थेट पालथाच पडतोय, अशी जहरी टीका गोपीचंड पडळकर यांनी केली होती. आज पाटील यांनी त्यांच्या टीकेला नाव न घेता जोरदार टीका केली. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, अस वक्तव्य पाटील यांनी करत पडळकरांना टोला लगावला आहे.

https://www.youtube.com/watch?v=byr_cjmscxo

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil On Gopichand Padalkar: स्वत:च्या गावात नव्हे, दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे शंकास्पद; जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.