महिला शक्तीचा आज उत्सव
esakal August 31, 2025 06:45 AM

महिलाशक्तीचा आज उत्सव
रायगड जिल्ह्यात गौराईच्या आगमनाने उत्साह
महाड, ता. ३० (बातमीदार) : दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जनानंतर आता गौराईच्या आगमनाने वेध लागले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास १७ हजार गौराईंची स्थापना होणार असून गौरी पूजनाचा मान माहेरवाशीणीचा असल्याने महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे.
सकाळपासूनच गौरी आणण्यासाठी महिला, लहान मुलांची लगबग सुरू आहे. घराजवळील ठिकठिकाणच्या विहिरी, नद्या तसेच पाणवठे ठिकाणी सुवासिनी आणि मुली एकत्र जमतात. महिला वर्ग नटूनथटून गौरीच्या आगमनासाठी सज्ज होतात. ग्रामीण भागातील महिला डोंगरातून तसेच जंगल भागातून तेरड्याची फुले, रोपांवर गौरीचा मुखवटा चढवला जातो. झिम्म्याचे फेर धरतच गौरीच्या डहाळ्याची पूजा करण्यात नेते. पारंपरिक वाद्याच्या निनादात गौरी मिरवणुकीने घरी विराजमान होतात. काही ठिकाणी गौरी मूर्ती केवळ मुखवटे, काही ठिकाणी तेरडा अथवा रोपांच्या रूपात तर काही भागांमध्ये खड्यांच्या स्वरूपात आणल्या जातात. निसर्गातील शक्तीची निसर्गातील साधनांच्या माध्यमातून पूजा करणे, हा मूळ उद्देश असतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.