IPL News Update : आयपीएल २०२६ पूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. गेल्या वर्षी राहुल द्रविंड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एका वर्षातच त्यांनी राजीनामा दिला. या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
राजस्थान रॉयल्स निवदेन जारी करत म्हटलं की, ''राहुल द्रविड अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा अनेक खेळाडूंच्या पिढीवर प्रभाव पडला, संघात मजबूत मूल्यांची रुजवण झाली आणि त्यांनी फ्रँचायझीच्या संस्कृतीवर छाप सोडली.''
Rahul Dravid: 'विराट कोहलीला कदाचित माझं बोलणं आवडणार नाही, पण...', द्रविड असं का म्हणाला, वाचा सविस्तरपुढे त्यांनी सांगितलं की, ''फ्रँचायझीच्या रचनात्मक पुनरावलोकनाचा भाग म्हणून राहुल द्रविड यांना संघात व्यापक जबाबदारी स्विकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी संघासाठी दिलेल्या योगदानाबाबत आम्ही आभारी आहोत'', असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ म्हणावा तितका प्रभावी राहिलेला नाही. आयपीएल 2025 मध्ये 14 सामन्यांपैकी केवळ चार सामन्यांत राजस्थान संघाला विजय मिळवता आला. गुणतालिकेत राजस्थानचा संघ नवव्या स्थानावर राहिला.
Premium|Rahul Dravid: राहुल द्रविड आणि ज्यो रूट यांना झेलांचे विक्रम गाठता आले. पण दोघांनाही समाधान मिळाले ते दुसऱ्याच्या यशात सहभागी होण्यातद्रविड़ यांनी राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या कार्यकाळातच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला. तर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती.