या सोप्या टिप्सने कोथिंबीर राहील आठवडाभर टवटवीत
Marathi September 01, 2025 01:25 PM

कोथिंबीर ही आपल्या स्वयंपाकघरातील चव आणि सुगंध वाढवणारी खास पालेभाजी आहे. पण बहुतांशवेळा दोन-तीन दिवसांतच तिच्या पानांचा तजेला कमी होतो, ती पिवळी पडते आणि शेवटी कचर्‍यात टाकावी लागते. त्यामुळे अनेकांना त्रास होतो. पण काही सोप्या घरगुती पद्धती वापरल्या तर कोथिंबीर आठवडाभर ताजी आणि कुरकुरीत राहू शकते.

(आठवडे कोथिंबीर ताजे कसे ठेवावे)

कोथिंबीर जास्त काळ ताजी कशी ठेवावी?

1.धुऊन सुकवा

सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवा आणि हलक्या कपड्याने किंवा पेपर टॉवेलने कोरडी करा. ओलसर पानं लवकर खराब होतात.

2.एअरटाइट डब्ब्यात साठवा

कोरडी केलेली पानं तशीच ठेवू शकता किंवा लहान तुकडे करून स्वच्छ, कोरड्या एअरटाइट डब्ब्यात भरा. हवे असल्यास त्यावर थोडं मीठ किंवा काही थेंब लिंबाचा रस टाकल्यास ताजेपणा जास्त काळ टिकतो.

3.फ्रिज किंवा फ्रीजरमध्ये ठेवा

डब्बा थेट फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे पानं हिरवीगार राहतील. तुम्हाला जास्त काळ साठवायची असल्यास कोथिंबीर चिरून बर्फाच्या ट्रेमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवता येते.

4.ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा

दुसरी सोपी पद्धत म्हणजे, कोथिंबीरच्या फक्त डंख (stems) एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये बुडवून ठेवा. आठवड्यातून दोन-तीनदा हे पाणी बदला. त्यामुळे पानं निस्तेज न होता ताजी राहतात.

5.पुदिन्याबरोबर साठवा

कोथिंबीरसोबत जर तुम्ही थोडी पुदिन्याची पानं ठेवली, तर कोथिंबीर पटकन खराब होत नाही. पुदिन्याच्या थंड गुणधर्मामुळे ती जास्त काळ ताजी राहते.

का करायची ही काळजी?

कोथिंबीर ही फक्त सजावटीची पालेभाजी नसून, तिच्यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि पचनास मदत करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ती ताजी राहणं आरोग्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे.

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही स्वयंपाकघरातली कोथिंबीर दीर्घकाळ ताजी ठेवू शकता. त्यामुळे अन्नाची चव आणि सुगंध दुप्पट होईल आणि पानं वाया जाणार नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.