Ahilyanagar Fraud: धनगरवाडीत पशुखाद्य डिलरशीपच्या बहाण्याने फसवणूक; शेतकऱ्याची पुण्यातील दोघांकडून ३ लाखांचा गंडा
esakal September 01, 2025 04:45 PM

अहिल्यानगर: दूधकांडी पशुखाद्याची डीलरशीप देण्याच्या बहाण्याने धनगरवाडी (ता. नगर) येथील शेतकऱ्याची पुण्यातील दोघांनी ३ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोपट शिकारे (वय ४५, रा. धनगरवाडी, ता. नगर) यांची २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विलास कासुर्डे व स्वप्नील मोरे (रा. स्वारगेट, पुणे) यांनी दूधकांडी हे पशुखाद्य तयार केलेले असून त्याची डीलरशीप देत असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर शिकारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ३ लाख रुपये अनामत रक्कम भरली. त्यानंतर अनेकदा त्यांना डीलरशीपबाबत संपर्क केला असता, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांचे फोन घेणेही टाळू लागले. आपली फसवणूक झाल्याचे शिकारे यांची खात्री झाली. अखेर त्यांनी २९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.