Israel Attack On Sana : बदला असा घेतला की, इस्रायलने डायरेक्ट या देशाच्या पंतप्रधानांना उडवलं, अनेक मंत्री सुद्धा जखमी
Tv9 Marathi September 01, 2025 04:45 PM

दोन महिन्यांपूर्वी इस्रायलच इराणसोबत भीषण युद्ध झालं होतं. मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल युद्धामध्येच व्यस्त आहे. सर्वप्रथम गाझा पट्टीत हमास विरुद्ध त्यानंतर लेबनानमध्ये हिजबोल्लाह विरोधात युद्ध केलं. आता इस्रायलने हुतींविरोधात मोर्चा उघडला आहे. या हुतींनी येमेनमध्ये सत्ता बळकावली आहे. इस्रायल अन्य शत्रुंविरुद्ध युद्ध लढत असताना हुती बंडखोर सातत्याने इस्रायलवर मिसाइल हल्ला करत होते. अनेकदा इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमला हुतींचे हे मिसाइल हल्ले रोखता आले नाहीत. त्यामुळे इस्रायलमध्ये जिवीत व वित्तहानी झाली. आपल्या तीन शत्रुंना धडा शिकवल्यानंतर इस्रायलने आता येमेनमधील हुतींकडे मोर्चा वळवला आहे.

येमेनची राजधानी सनामध्ये इस्रायलने एअरस्ट्राइक केला. यात इराण समर्थित हुती बंडखोरांचे पंतप्रधान अहमद अल-रहावी यांचा मृत्यू झाला. हुती बंडखोरांना शनिवारी याची पृष्टी केली. बंडखोरांनी एका वक्तव्यामध्ये म्हटलं की, अहमद अल-रहावी गुरुवारी सनामध्ये झालेल्या हल्ल्यात मारले गेले. त्यांच्या सरकारचे अनेक मंत्री सुद्धा जखमी झाले आहेत. येमेनच्या सनामध्ये हुतींच्या हाती सत्ता आहे. इस्रायली सैन्याने गुरुवारी अचूक हल्ला केला. ऑगस्ट 2024 पासून अल-रहावी हुतींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.

त्यावेळी इस्रायलने हा हल्ला केला

रहावी यांची हुती नियंत्रित सरकारच्या अन्य सदस्यांसोबत बैठक चाललेली. मागच्या वर्षीच्या कारभाराचा ते आढावा घेत होते, त्यावेळी इस्रायलने हा हल्ला केला. गाजापट्टीत हमास विरुद्ध इस्रायलच युद्ध सुरु असताना हुती बंडखोरांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ अनेकदा इस्रायलवर मिसाइल हल्ला केला होता.

त्यानंतरही हल्ले थांबले नाहीत

हुती बंडखोरांनी वारंवार इस्रायलवर हल्ले केलेत. खासकरुन इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असताना हे हल्ले केले. पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ आम्ही हल्ले केले, असं हुती बंडखोरांचं म्हणणं आहे. बहुतांश मिसाइल इस्रायलने हवेतच नष्ट केली होती. पण त्यानंतर हुतींचे हल्ले थांबले नाहीत.

ट्रकच्या संख्येत कपात करणार

इस्रायल हमास विरुद्ध आपल्या सैन्य अभियानाचा विस्तार करणार आहे. उत्तर गाजाच्या काही भागांमध्ये मानवीय सहायता पुरवठा लवकरच रोखणार आहे किंवा वेग कमी करणार आहे. इस्रायलने गाझाला युद्ध क्षेत्र घोषित केलय. इस्रायल पुढच्या काही दिवसात गाझा सिटीमध्ये हवाई मार्गाने मानवी सहाय्यता पोहोचवण्यावर बंदी आणणार आहे. उत्तरी क्षेत्रात मदत साहित्य पोहोचवणाऱ्या ट्रकच्या संख्येत कपात करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.