लेनोवोने भारतात त्यांचा नवीन एंट्री-लेव्हल टॅबलेट लेनोवो टॅब लाँच केला आहे. यात मीडियाटेक हेलियो जी 85 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. या टॅबलेटमध्ये 10.1 इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे, जो 60 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. यात 5,100 एमएएच बॅटरी आहे जी 15 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. तर या टॅबमध्ये तुम्ही फक्त वाय-फाय ओनली आणि वाय-फाय + एलटीई व्हर्जनमधून निवडू शकतात. फोटो आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तसेच यात डॉल्बी अॅटमॉसने सुसज्ज ड्युअल स्पीकर सेटअप आहे.
लेनोवो टॅबची भारतातील किंमत
लेनोवो टॅबच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच यातील रॅम आणि स्टोरेज असलेल्या वाय-फाय + एलटीई मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या वाय-फाय व्हर्जनची किंमत 11,998 रुपयांना उपलब्ध आहे. लेनोवो टॅबपोलर ब्लू कलर पर्यायात येतो. तसेच तुम्ही हा टॅब Lenovo.com, Lenovo एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि इतर ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करू शकता. हा नवीन टॅबलेट लेनोवो आयडिया टॅबसोबत लाँच करण्यात आला होता, ज्याचा बेस व्हेरिएंट 16,999 रुपये आहे.
लेनोवो टॅबचे स्पेसिफिकेशन्स
लेनोवो टॅब अँड्रॉइड 14 आधारित लेनोवो ZUI 16 वर चालतो आणि त्यात दोन वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा पॅचेस मिळतील. यात 10.1-इंचाचा फुल-एचडी (1200×1920 पिक्सेल) डिस्प्ले आहे, जो 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 400 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. डिस्प्लेला लो ब्लू लाइट ॲनिमेशन TÜV प्रमाणपत्र मिळाले आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G85 चिपसेट, 4 जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम आणि 128 जीबी ईएमएमसी स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी, लेनोवो टॅबमध्ये 8-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात डॉल्बी अॅटमॉस ट्यूनिंगसह ड्युअल स्पीकर्स आणि मेटल बॉडी डिझाइन आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.3 आणि वाय-फाय 5 सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. हा टॅबलेट एका क्लिअर केससह येतो ज्यामध्ये इनबिल्ट किकस्टँड आहे. लेनोवो टॅब हा स्टँडबाय मोडमध्ये ते डिजिटल फोटो फ्रेम किंवा घड्याळात रूपांतरित केले जाऊ शकते. लेनोवो टॅबमध्ये 5,100mAh बॅटरी आहे जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचा आकार 9.5×235.7×154.5mm आहे.