बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या अनोख्या स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे आऊटफिट असो, बॅग किंवा ज्वेलरी असो दरवेळी ती एका नव्या लूकमध्ये दिसून येत असते. अलिकडेच, आलिया भट्टच्या एका अंगठीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे तिच्या या अंगठीची जगाला भुरळ पडली आहे. आता तुम्ही म्हणाल की ही रिंग एवढी खास का आहे? तर तेच आपण जाणून घेऊया…
आलिया भट्टने घातलेली अंगठी ही हेल्थ ट्रॅकर आहे. या अंगठीला ऑरा रिंग असे म्हणतात. दिसायला ही अंगठी एक प्रकारच्या बँडसारखी असते. सोनं किंवा चांदीसारखी ही अंगठी दिसत असली तरी ती वेगळ्या धातूपासून तयार केलेली असते. पण सिल्व्हर किंवा गोल्ड कलरमध्ये ही अंगठी मिळते. या अंगठीचे वैशिष्ट्ये म्हणजे मॉडर्नसह पारंपरिक दोन्ही लूकवर ही रिंग शोभून दिसते. सध्या गोल्डन कलरच्या या अंगठीला प्रचंड मागणी आहे.
आरोग्यदायी फायदे
ही ऑरा रिंग काही सामान्य ऍक्सेसरी नव्हे. आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही अंगठी एक स्मार्ट हेल्थ ट्रॅकर आहे. म्हणजेच तुमच्या शरीराच्या अनेक क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यास ही अंगठी मदत करते. तुमच्या झोपेचे क्लॉक, हृदय गती, शरीराचे तापमान आणि अगदी तणाव पातळीचे निरीक्षण ही रिंग करते. त्यामुळे ही रिंग घालून तुम्ही स्टायलिश लूक तर कॅरी करूच शकता शिवाय आरोग्याची काळजीही घेऊ शकता. यामुळेच या अंगठीने जगाला भुरळ घातली आहे.
परदेशी सेलिब्रिटीही घालतात ऑरा रिंग
आलिया भट्टप्रमाणेच, अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी देखील ही अंगठी घालतात. हॉलिवूड स्टार किम कार्दशियनपासून ते ब्रिटनच्या प्रिन्स हॅरीपर्यंत, प्रत्येकजण ओरा रिंगचा चाहता आहे. यामुळेच ही अंगठी आज जागतिक स्तरावर एक स्टाईल आणि फिटनेस ट्रेंड बनली आहे.
निर्मिती आणि किंमत
ही अंगठी एरोस्पेस ग्रेड टायटॅनियमपासून बनलेली आहे. नंतर गोल्ड, रोज गोल्ड किंवा सिल्व्हर कोटिंग दिली जाते. म्हणूनच ही अंगठी आकर्षक दिसते. शिवाय याचे फिनिशिंगही चांगले असते.
किंमत
या अंगठीची किंमत रंग आणि डिझाइननुसार बदलते. आलिया भट्टच्या सोनेरी ओरा अंगठीची किंमत सुमारे ४३,७३७ रुपये असल्याचे सांगितले जाते.