आरोग्यासाठी मॅग्नेशियमचं कवच! रोजच्या आहारात हे सुपरफूड्स का आहेत गरजेचे?
esakal September 01, 2025 06:45 PM
Magnesium Deficiency मॅग्नेशियमची कमतरता

शरीरातल्या ३०० हून अधिक जैवरासायनिक प्रक्रियांसाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. त्याची कमतरता हृदयविकार, मधुमेह आणि हाडांच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. आहारात ही ५ मॅग्नेशियमयुक्त पदार्थ जरूर जोडा.

Dark Chocolate डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये १ औंस (२८ ग्रॅम) मध्ये साधारण ६५ मि.ग्रॅ. मॅग्नेशियम असते. अँटिऑक्सिडंट्समुळे सूज कमी होते व हृदय निरोगी राहते.

Avocado ॲव्होकॅडो

मध्यम आकाराच्या एका ॲव्होकॅडोत सुमारे ५८ मि.ग्रॅ. मॅग्नेशियम मिळते. त्यात पोटॅशियम, हेल्दी फॅट्स आणि फायबर भरपूर असतात.

Almonds बदाम

२३ बदामांच्या (१ औंस) मूठभर खाल्ल्यास साधारण ८० मि.ग्रॅ. मॅग्नेशियम मिळते. बदामांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Spinach पालक

एक कप शिजवलेल्या पालकात तब्बल १५७ मि.ग्रॅ. मॅग्नेशियम मिळते. पालकात लोह, व्हिटॅमिन A व C मुबलक प्रमाणात असतात.

Black Beans काळा घेवडा (ब्लॅक बीन्स)

एक कप शिजवलेल्या ब्लॅक बीन्समध्ये १२० मि.ग्रॅ. मॅग्नेशियम मिळते. हे फायबर व प्रथिनांनी समृद्ध असून मधुमेहाचा धोका कमी करतात.

Bone and Muscle Health स्नायू व हाडांचे आरोग्य

मॅग्नेशियमयुक्त आहार घेतल्यास स्नायू कार्य व्यवस्थित राहते आणि हाडे मजबूत होतात.

High Blood Pressure हृदय व रक्तदाब नियंत्रण

नियमित मॅग्नेशियम सेवनामुळे हृदयाचे ठोके सुरळीत राहतात आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.

Magnesium Rich Food सोपे उपाय

डार्क चॉकलेटचे छोटे तुकडे, ॲव्होकॅडो टोस्ट, बदाम स्नॅक, पालक सॅलड किंवा ब्लॅक बीन्स टॅको – अशा छोट्या बदलांनी मॅग्नेशियमची कमतरता टाळता येते.

Best Plants to Plant for Diabetes डायबिटीजला करा रामराम! घराच्या गच्चीवर उगवा ही डायबिटीज फ्रेंडली ६ झाडे आणखी वाचा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.