जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करा, जरांगे खजूर खाता है ? अंडा खाता है ? काय म्हणाले सदावर्ते ?
Tv9 Marathi September 01, 2025 06:45 PM

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात शुक्रवारपासून उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आता जरांगे यांनी आपण पाणी देखील घेणार नाही असे म्हटले आहे.यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील आपल्या उपोषणाची वैद्यकीय अधिकाऱ्यांद्वारे चाचणी करुन घ्यायला काय तयार नाहीत. त्यांचे वजन, नाडीचे ठोके आणि इतर तपासण्या केल्या जात नाहीत असाही सवाल सदावर्ते यांनी केला आहे.

मनोज जरागे यांना भेटायला आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर त्या निघाल्या तेव्हा त्यांच्यावर मराठा आंदोलकांनी पाण्याची बाटली फेकली. त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला. यावर वकील सदावर्ते यांनी जे पेरलं ते उगवत असते. शरद पवार आधी मराठ्यांना आरक्षण मिळू शकणार नाही असे म्हणत होते. ते पवार आता घटना बदला असे म्हणत वकीली करत आहेत. अत्यंत गलिच्छ राजकारण शरद पवार करीत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी यावेळी केला. म्हणून सुप्रिया सुळे यांच्यावर उष्ट्या पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या. लोक सगळं विसरु शकत नाहीत असेही ते म्हणाले.

गुन्हा दाखल करावा

मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते महिला पत्रकारांशी असभ्यपणे वागत आहेत. काही महिला पत्रकार माझ्याशी बोलत होत्या.दोन मंत्र्यांबातत जरांगे यांनी बेताल भाषा चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे या दोघा मंत्र्यांवर त्यांनी अश्लाघ्य टीका केली आहे. नितेश राणे यांनी तर चिचुंद्री म्हणाले आहेत. त्यांच्या आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

खजूर खातात की अंडे खातात

जरांगे यांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फेत तपासणी केली पाहिजेत.ते उपोषण करतात ते कशावरुन, ते काही तपासणी करायला राजी होत नाहीत. त्यांचे वजन मोजले जाते. त्यांच्या नाडीचे ठोके मोजले जातात. ते उपोषण करताना नेमके काय खातात.. खजूर खातात की अंडे खातात याचा शोध घेतला पाहिजे असाही आरोप सदावर्ते यांनी यावेळी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.