डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हेच नाही तर रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद केली तर आम्ही 25 टक्के टॅरिफ कमी करू असे त्यांनी म्हटले. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प बेहाल झाल्याचे बघायला मिळतंय. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही किंवा भारत अमेरिकेसोबत चर्चा देखील करत नाही. भारत हा टॅरिफचा महाराजा आहे, असे अमेरिकेकडून सांगितले जातंय. भारताने स्पष्ट केले की, आम्ही कुठूनही तेल खरेदी करू शकतो, तुम्हाला नाही घ्यायच्या आमच्या वस्तू तर नका घेऊ. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्यामागचे कारणेही पुढे आलंय. पाकिस्तानची भूमिका टॅरिफच्या मुद्द्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे.
अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची जवळीकता वाढवण्यासाठी पाकिस्तानने मोठा डाव भारताच्या विरोधात टाकला. हैराण करणारे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या डावामध्ये फसले देखील ट्रम्प कुटुंबासोबत व्यावसायिक करार करण्याची पाकिस्तानची इच्छा केली होती.. हेच नाही तर तशी ऑफर देखील डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानने दिली.
ट्रम्प कुटुंबाकडून वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलसोबत मोठा करार केला. मात्र, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना भारताला दूर करणे आवश्यक होती आणि तशी चाल देखील पाकिस्तानची होती. भारताला जवळ ठेऊन डोनाल्ड ट्रम्प हा करार पाकिस्तानसोबत करू शकत नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांना हे माहिती होते की, भारतावर आपण टॅरिफ लावला की, भारत हा आपल्यापासून दूर जाईल, दुसरे काहीही करण्याची गरज नाही.
अमेरिकेकडून भारतावर सतत आरोप केले जात आहेत की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र, हे जगाला दाखवण्यासाठी फक्त अमेरिका आरोप करत आहेत. त्याच्या मागचे गणित आणि समिकरण पूर्णपणे वेगळी आहेत. टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि चीनची जवळीकता वाढल्याने अमेरिकेची पोटदुखी उठली आहे.