Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार
Saam TV September 03, 2025 10:45 AM

Summary -

  • मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून सरकारने जीआर काढला.

  • आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयावर गुणरत्न सदावर्ते आक्षेप.

  • पोलिसांवर झालेल्या मारहाणीचे गुन्हे मागे घेणे शक्य नसल्याचे त्यांचे मत.

  • सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याची सदावर्ते यांची घोषणा.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे ५ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते. सरकारने आज त्यांच्या मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला. सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच मनोज जरांगेंना लॉलिपॉप मिळाला असल्याची टीका सदावर्ते यांनी केली.

Maratha Reservation: राजे तुमचा शब्द अंतिम.. तुम्ही 15 दिवस बोलले, मी एक महिना वेळ देतो, मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? VIDEO

मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे त्यांनी जरांगेंना सांगितले. यासंदर्भातला मसूदा देखील त्यांनी दिला. यामध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचेही सरकारने मान्य केल्याचे नमूद केले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

Maratha Reservation GR: मराठा आरक्षण GR चा राज्यात फायदा? पाहा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले? VIDEO

जर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले तर मी कोर्टात जाणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आंदोलनादरम्यान आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांना मारहाण झाली होती. मराठा आंदोलकांवर दाखल असलेले अशाप्रकारचे गुन्हे मागे घेतले तर मी कोर्टात जाणार. पोलिसाचा मुलगा म्हणून मी सांगतो की पोलिसांना मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाहीत. हे गुन्हे सरकार परत घेऊ शकत नाही. अशाप्रकारचे गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. जरांगे आणि मराठा लीडरशिपमुळे मारहाण केलेले गुन्हा मागे घेतले गेले तर मी कोर्टात जाणार. तसेच ज्यांच्या दबावामुळे हे गुन्हे मागे घेतले जातील त्या सगळ्यांना मी प्रतिवादी करून न्यायालयामध्ये उभे करणार.', असा इशारा सदावर्ते यांनी दिला.

Maratha Reservation : मराठा बांधव उतरले रस्त्यावर; राहुरीत अडवला महामार्ग, नायगावमध्येही कडकडीत बंद
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.