तुळजापूर : मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर तुळजाभवानी मातेची आरती समाज बांधवांनी मंगळवारी ता.2 सायंकाळी केली. शहरात मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापासून मोठी रॅली मराठा समाज बांधवांनी काढली.
भवानी रस्ता मार्गे जाऊन तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली. यावेळी कुंकवाची उधळण करण्यात आली. पेढेही वाटप करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी ही करण्यात आली.
यावेळी सज्जनराव साळुंके, महेश गवळी, कुमार टोले, धैर्यशील कापसे, अमोल कुतवळ, प्रशांत अपराध, प्रशांत सोंजी, अजय साळुंखे, अर्जुन साळुंखे, लखन पेंदे, सचिन रोचकरी, शांताराम पेंदे, अमर हंगरगेकर, लक्ष्मण नन्नवरे, मयूर कदम आदीसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.