-rat२p१७.jpg-
२५N८८९७३
समीर कालेकर
---
समीर कालेकरांना क्रीडारत्न पुरस्कार
सावर्डे, ता. २ : दुर्गेवाडी येथील कृतज्ञता मंच व रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय क्रीडारत्न पुरस्कार युनायटेड इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक समीर कालेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार कृतज्ञता मंचाचे अध्यक्ष शांताराम देशपांडे, ॲड. प्रसाद देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, राहुल टोपले आदींच्या हस्ते ५ सप्टेंबरला रत्नागिरी येथील गोडावून स्टॉपजवळील साई मंदिर हॉलमध्ये दिला जाणार आहे.