पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (6 सप्टेंबर) सकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे. यासाठी मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. सकाळी सातपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील 17 प्रमुख रस्ते बंद राहतील. तसेच पुढील 48 तास जड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. पोलिसांनी नागरिकांसाठी पर्यायी मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था केली आहे. वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे मिरवणूक सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यास मदत होईल.
अंबादास दानवेंची मनोज जरांगे पाटलांना भेट, तब्येतीची घेतली माहितीविधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट, गणरायाचे दर्शनराधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
पुण्यात ओबीसी समाजाकडून आरक्षण वाचवण्यासाठी मोठे महाघंटानाद आंदोलन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. आंदोलनानंतर समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ओबीसी समाजाची ठाम मागणी आहे की, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्यात यावा. त्यांचे म्हणणे आहे की मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे हक्क धोक्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी ओबीसी समाजाकडून जोरदारपणे केली जात आहे.
ओबीसींवर अन्याय होणार नाही, भुजबळांच्या शंका मिटवू – फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, छगन भुजबळ नाराज नाहीत आणि त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या जातील. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची हमी त्यांनी दिली. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनेक ओबीसी संघटनांनी स्वागत केले आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
Sharad Pawar : मुंबईतील सिल्वर ओकवर गौतम अदाणी-शरद पवार भेटउद्योगपती गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या सिल्वर ओक निवासस्थानी अदाणी गेले आहेत.पवार व अदाणी यांच्यात कोणत्या मुद्द्यावरुन चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही.
OBC Protest | हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का नाही" अतुल सावेंची माहितीनागपुरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. मंत्री अतुल सावेंनी आंदोलकांची भेट घेतली. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का नाही अशी माहिती अतुल सावेंनी दिली. ओबीसी आरक्षणाला अडचण येणार नाही असं ते म्हणाले.
OBC Protest | नागपुरात आंदोलनस्थळी मंत्री अतुल सावे दाखलनागपूरमध्ये ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची मंत्री अतुल सावे भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करत आहेत. बैठकीत आंदोलनाची कारणे आणि तोडगा यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
OBC LIVE: ओबीसी आंदोलकांची मुख्यमंत्री फडणवीस घेणार भेटनागपुरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलकांची भेट घेणार आहे. आंदोलकांचे साखळी उपोषण सुरु असून फडणवीस आंदोलकांशी भेटून चर्चा करणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या 12 मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अतुल सावे यांनी दिले. उपोषण सोडण्याची मागणी त्यांनी केली. Nanded live: 'नेता शब्द पाळणारा' फडणवीसMaharashtra Today: भाजपकडून नांदेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचे श्रेय देणारा यावर मजकूर लिहिलेला आहे.
'नेता शब्द पाळणारा' असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आला आहे. फडणवीसांसोबत मनोज जरांगेंचाही फोटो लावला आहे.
OBC Live: ओबीसी-मराठा आरक्षण मुद्या पेटलामराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु असताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा बैठकीला हजर न राहता अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा निषेध केला आहै. सध्या राज्यात ओबीसी-मराठा आरक्षण मुद्या पेटला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Maratha reservation live: जी.आर बनविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नकुणी कितीही समित्या बनविल्या तरी आरक्षण मिळणार, असा ठाम विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. जी.आर बनविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जरांगे म्हणाले.
OBC LIVE: ओबीसी आंदोलकांची सावे घेणार भेटMaharashtra Breaking News Today: नागपुरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे हे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत. नागपुरातील आंदोलनस्थळी जाऊन ते भेट घेणार आहेत. सावेंवर ओबसी समाजाची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jalna LIVE: : जालण्यात आता नगरसेवकाची संख्या 65 वर जाणारजालना महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता नगरसेवकाची संख्या 65 वर जाणार आहे. 15 सप्टेंबर पर्यंत हरकती दाखल करता येणार असून 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे.
BEED LIVE Updates : मित्रानेच केली मित्राची धारदार शस्त्राने हत्याबीडमध्ये स्वराज्यनगर भागात चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती आहे. किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपीला पाठलाग करून पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.विजय काळे असे मृत युवकाचे नाव आहे. अभिषेक गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने कामगारांचे कामाचे तास 9 वरून 12 केलेकामगार टंचाईवर मात करणे, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे आणि राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होऊन विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली आहे. त्यानुसार यापुढे दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9 तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास 12 तास काम करावे लागणार आहे.
OBC : ओबीसींसाठीच्या उपसमितीत 8 मंत्र्यांचा समावेशचंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या उपसमितीत 8 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये गुलाबराव पाटील, संजय राठोड, छगन भुजबळ आणि दत्तात्रय भरणे या मंत्र्यांचा समावेश आहे. तर अतुल सावे, पंकजा मुंडे आणि गणेश नाईक हे देखील समितीचे सदस्य आहेत. ओबीसी समाजाकडून दीर्घकाळापासून या उपसमितीची मागणी करण्यात येत होती. अखेर ती मागणी सरकारने मान्य केली आहे.
OBC : पुण्यात आज OBC संघटनांचं आंदोलनराज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या जी.आर विरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. आरक्षणाच्या कृती समिती आणि समता परिषदेकडून पुण्यात हे आंदोलन केलं जाणार आहे.
BJP Politics : मनसे नेते वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबलामनसे नेते वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती होणार होता. मात्र, काही कारणामुळे आज होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
Pune Weather : पुण्यात ऑरेंज अलर्ट तर कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशाराहवामान विभागाने महाराष्ट्रासह गोव्याच्या किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
OBC Reservation : OBC आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवसमराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये याबाबतचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी जिथून मराठा आरक्षणाच्या लढाईला सुरूवात केली त्याच अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
Narayan Rane : नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखलभाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल केलं असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
GST News : जीएसटीत 5 आणि 18 टक्क्यांच्या दोनच श्रेणीकेंद्र सरकार जीएसटीचे 12 आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द केले असून आता 5 आणि 18 टक्क्यांचा स्लॅब लागू राहणार आहे. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह इतर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. तर नवा स्लॅब 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.