अनंत चतुर्दशीला चुकूनही हा पांढरा पदार्ख खाऊ नका; 14 वर्षे भोगावे लागतील त्याचे परिणाम
Tv9 Marathi September 04, 2025 08:45 PM

6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला साजरी होणाऱ्या अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा व उपवास केला जातो. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या अनंत रूपासह शेषनागाचीही पूजा केली जाते व 14 गाठींचे अनंत सूत्र म्हणजे 14 गाठी मारलेला पवित्र धागा किंवा ज्याला काहीजण कलावा देखील म्हणतात. बांधल्याने संकटे दूर होतात असं म्हटलं जातं.

अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग

तसेच अनेक महिला तर आपल्या पतीसाठी खास उपवास ठेवतात. महिला त्यांचे सौभाग्य रक्षण करण्यासाठी आणि सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी उपवास करतात. एवढंच नाही तर अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग उघडतो असंही म्हटलं जातं. अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या.

हा एक पांढरा पदार्थ खाणे टाळावे

पण तुम्हाला माहित आहे का हिंदू परंपरेनुसार, अनंत चतुर्दशीच्या उपवास करत असाल तर हा एक पांढरा पदार्थ आहे जो खाणे टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे उपवासाची शुद्धता आणि पावित्र्य जपली जाते. त्यामुळे अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊयात.

कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

तर शास्त्रांमध्ये म्हटल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या व्रतामध्ये ज्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे असा पदार्थ म्हणजे मीठ. होय, उपवासात चुकूनही सामान्य मीठ खाऊ नये. कारण असे मानले जाते की त्यामुळे त्याचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच त्याचे वाईट परिणाम 14 वर्ष भोगावे लागतात.

उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते

मुख्यत: उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते. सामान्य मीठ अशुद्ध मानले जाते, तर सैंधव मीठ पवित्र समजले जाऊन उपवासासाठी योग्य मानले जाते. कारण शास्त्रानुसार सैंधव मीठ पवित्र मानले जाते. ते शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढते आणि उपवासाची पावित्र्यपूर्णता टिकवते. तसेच तुम्ही अनंत चतुर्दशीला बटाटा, साबुदाणा, फळे, मिठाई, मखाणा खीर, रताळे असे पदार्थ खाऊ शकता. अनंत चतुर्दशीला मीठ त्यागल्याने पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं.भक्ताला अनंत पुण्यफळांचा लाभ मिळतो.

अनंत सूत्र बांधणे म्हणजे काय?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, अनंत सूत्राला 14 गाठी बांधणे अत्यंत शुभ असते. म्हणजे लाल धागा किंवा कलावा ज्याला 14 गाठी मारून पूजा करून हातात बांधला जातो.

अनंत चतुर्दशीला इतर करण्यासारखे उपाय

तसेच जर घरात समस्या असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर या दिवशी पूजा केल्यानंतर कलशात लवंगा आणि कापूर टाका आणि तो पेटवा, नंतर कलश घराभोवती फिरवा आणि एका चौरस्त्यावर ठेवा. किंवा दाराबाहेर ठेवला तरी चालेल.

भगवान विष्णूंची पूजा करा. तसेच त्यांचे मंत्रजाप करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.