Mumbai Dadar Fire: दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना आग; 12 वाहने जळून खाक
Saam TV September 05, 2025 03:45 AM

मयूर राणे, साम प्रतिनिधी

मुंबईतील दादर या रेल्वे स्टेशन जवळील पार्किगमधील वाहनांना आग लागल्याची घटना घडलीय. स्टेशनच्या फलाट क्रमांक १२ जवळ ही पार्किंग आहे. यात उभे असलेल्या गाड्यांना आग लागलीय. या आगीत १० ते १२ आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. पार्किंगमधील वाहनांना आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाहीय. मात्र यात आगीत १० ते १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. आगीचं नेमकं कारण काय याचा माटुंगा पोलीस शोध घेत आहेत

दादरच्या फलट क्रमांक 14 च्या शेजारी असलेल्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. एक रहिवासी त्याच्या घरातील एका व्यक्तीस रेल्वे स्टेशनला सोडायला आला असता त्याच्या गाडीला अचानक आग लागली.

त्यानंतर बाकीच्या गाड्यांना देखील आग लागली. या आगीमध्ये पंधराहून अधिक गाड्या या जळून खाक झालेल्या पाहायला मिळाल्या घटनास्थळी अग्निशामक दल आणि मुंबई पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेच्या सर्व तपास केला जात आहे. या घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.