सतत गुडघे दुखतात? एकदा 'हे' पान वापरून पाहा!
esakal September 05, 2025 05:45 AM
गुडघेदुखीने त्रस्त आहात?

वय वाढलं की गुडघेदुखी सामान्य होऊ लागते. चालताना, बसताना त्रास होतो का? मग हा नैसर्गिक उपाय नक्की वापरून पहा.

घरगुती उपाय

वडाच्या झाडाची पाने आयुर्वेदात खूप उपयोगी मानली जातात. त्यात असणारे औषधी गुणधर्म सांधेदुखीवर परिणामकारक असतात.

सूज आणि वेदना कमी करते

वडाच्या पानांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे गुडघ्याची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

कसं वापरायचं?

ताजं वडाचं पान गरम पाण्यात शिजवा. त्याला थोडं गार झाल्यावर दुखत असलेल्या गुडघ्यावर लावा.

किती वेळ ठेवायचं?

गरम वडाचं पान रात्री झोपताना गुडघ्यावर बांधा आणि सकाळपर्यंत तसंच ठेवा. दररोज हा उपाय केल्यास लवकर आराम मिळतो.

नियमित वापराचे फायदे

दररोज हा उपाय केल्यास वेदना हळूहळू कमी होते, सूज उतरते आणि चालताना होणाऱ्या त्रासात दिलासा मिळतो.

लक्षात ठेवा

खूप गंभीर दुखणं असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. घरगुती उपाय हे केवळ पूरक उपचार आहेत.

मुलं मोबाईलपासून दूर होत नाहीत? वापरा 'ही' सोपी आणि प्रभावी ट्रिक! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.