Farmers vs Railway Contractor : मिरज-कोल्हापूर रेल्वे लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला ४७.१ किलोमीटर सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर फिक्स्ड नॉट सेफ्टी फेन्सिंग (सुरक्षा जाळी) बांधण्यासाठी काम सुरू केले आहे. दरम्यान, जैनापूर (ता. शिरोळ) येथील रेल्वे गेटजवळ चिपरी व जैनापूरच्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरून सुरू असलेले काम बंद पाडले, तर शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी व रेल्वेच्या हद्दी निश्चित केल्याशिवाय काम सुरू केल्यास रेल्वे रोको करणार असल्याचा इशारा, स्वाभिमानीचे नेते विक्रम पाटील यांनी दिला.
पुणे येथील सिनियर डेन (एस) अंतर्गत मिरज-कोल्हापूर विभागातील सुरक्षा व अतिक्रमण रोखण्यासाठी ट्रॅकवर फिक्स्ड नॉट सेफ्टी फेन्सिंगची तरतूद केली आहे. यात ४७.१ किलोमीटर कामासाठी स्कायलाईन-महालक्ष्मी जेव्ही या कंपनीची नियुक्ती केली आहे. याकरिता जवळपास २२ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. यातूनच ठेकेदाराने जैनापूर येथे कामाला सुरुवात केली होती. ही बाब जैनापूर व चिपरी येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्रित येत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली.
Kolhapur RTO Scam : नेत्याचा अट्टाहास ९०० नंबरवरून काळाबाजार, पुढाऱ्यांना व्हीआयपी दर्जा; परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यानेच दिली कबुलीजैनापूर येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी धाव घेऊन ठेकेदाराला याबाबत विचारणा केली. रेल्वे कर्मचारी व कामाचा सुपरवायझर यांना शेतकऱ्यांच्य शेतीची मोजणी करून हद्द निश्चित कर. रेल्वेच्या हद्दीही शेतकऱ्यांना दाखवा, अशी मागणी करीत सुरू असलेले काम बंद पाडले.
यावेळी अमोल संकपाळ, वर्धमान मगदूम, बाहुबली चौगुले, सुरेश शहापुरे, गोपाळसिंग राजपूत, प्रकाश पाटील, तेजपाल पाटील, रवींद्र मगदूम, विठ्ठल जगदाळे, धैर्यशील दळवी, दीपक पाटील, चेतन पाटील, अनिल पाटील, सम्राट दळवी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्याने ठेकेदारांमध्ये बराच काळ बांधकामावरून वाद सुरू होता ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे ठेकेदारांनी काम बंद केले.