पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनीनं जैविक अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली जाते. पतंजलीच्या दाव्यानुसार स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून स्थापन करण्यात आलेली कंपनी फक्त आयुर्वेदिक उत्पादनासाठीच ओळखली जात नाही तर पर्यावरणाच्या बाबत असलेली जबाबदारी पार पाडत आहे. पतंजलीच्या जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या सारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण आणि ग्राहकांसाठी एक सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
पतंजलीनं सांगितल्यानुसार, पतंजली ऑर्गेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे कंपनीनं जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. ही संस्था जैविक उर्वरक आणि जैविक कीटकनाशकांच्या विकासासाठी काम करतेय, याद्वारे रासायनिक उर्वरक म्हणजेच खतांवरील अवलंबित्व कमी होतं. यामुळं मातीची सुपिकता वाढते, यामुळं जल आणि वायूप्रदूषण कमी होतं. जैव विविधतेला प्रोत्साहन मिळतं. PORI नं 8 राज्यांमध्ये 8413 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत जैविक शेतीच्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास मदत केली आहे. या अभियानामुळं केवळ पर्यावरण स्वच्छ राहत नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते.
पतंजलीच्या दाव्यानुसार, कंपनीचं सौर ऊर्जा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे, कंपनीनं सौर पॅनेल, इनवर्टर आणि बॅटरीला किफायतशीर बनवून ग्रामीण क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन दिलं आहे. स्वामी रामदेव यांच्या व्हिजननुसार प्रत्येक गाव आणि शहरात पतंजली एनर्जी सेंटर स्थापन केलं जाईल, यामुळं कार्बन उत्सर्जन कमी होईल. याशिवाय कंपनीनं कचरा व्यवस्थापनात अनोखं पाऊल टाकलं आहे. पतंजली विद्यापीठात सुख्या कचऱ्याचं खतात रुपांतर केलं जातं. शेणापासून यज्ञासाठी पवित्र उत्पादनं तयार केली जातात. हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आहे.
पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीनं पर्यावरणस्नेही अनुकूल पॅकेजिंग आण रसायन मुक्त उत्पादनं ग्राहकांना स्वस्थ आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देते. कंपनीची आयुर्वेदिक औषधे, जैविक खाद्य पदार्थ आणि प्राकृतिक सौंदर्य प्रसाधनं केवळ आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. तर, पर्यावरणाला देखील नुकसान पोहोचवत नाहीत. पतंजलीचा दृष्टिकोन हा आहे की खरी प्रगती तेव्हाच शक्य जेव्हा आपण व्यक्ती आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी धान्यात घेऊ.
जैविक उत्पादनांच्या विपणन आणि वितरणात काही आव्हानं आहेत. मात्र, पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीचं विश्वसनीय नाव आणि ग्राहकांसोबत थेट संपर्क या अडचणींना दूर करत आहे. पंतजलीनं म्हटलं की हे केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि सातत्यपूर्ण विकासासाठी एक उदाहरण बनलं आहे. पतंजलीचं जैविक अभियान स्पष्ट करत की व्यवसाय आणि पर्यावरण संरक्षण एकासोबत होऊ शकतं. यामुळे केवळ ग्राहकांना लाभ मिळत नाही तर पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहण्यासंदर्भात त्याचा फायदा होईल.
आणखी वाचा