बँकेतून पैसे काढले, कोर्टाकडे गेले, शेवटचे रेल्वे स्टेशनवर दिसले, मोबाईलही बंद… शिंदे गटाचा नेता रहस्यमयरित्या गायब, जळगाव हादरले
Tv9 Marathi September 06, 2025 01:45 AM

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात , राजकारणात खळबळ माजेल अशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते अचानक रहस्यमयरित्या गायब झाल्याने कुटुंबिय चिंतातूर आहेत. ते नक्की कुठे गेले, कोणाकडे गेले हे समजाला मार्ग नाही. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईली सध्या बंद असल्याने थांगपत्ता लागण्यास अडचण येत आहेत. पोलिसांकडून पाटील यांचा कसून शोध घेतला जात आहे.

बँकेतून पैसे काढले, कोर्टाकडे गेले, शेवटचे रेल्वे स्टेशनवर दिसले आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पाटील हे धरणगाव तालुक्यातील रहिवासी असून ते सध्या धुळे येथे वास्तव्यास होते. आपण गावाकडे जात आहोत, असे सांगत ते काही दिवसांपूर्वी ते घरातून निघाले. मात्र परत आलेच नाहीत. बराच काळ त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही अखेर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली.

गावाकडे निघालेले संजय पाटील हे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील एका बँकेतून पैसे काढताना व त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसून आले. मात्र नंतर त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. मुख्य म्हणजे पाटील यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद असल्याने त्यांच्याशी जराही संपर्क होऊ शकला नाही. ते शेवटचे जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्येच्या रेल्वेत बसताना दिसल्याची माहिती मिळाली . त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस अधिक तपास करत असून पाटील रहस्यमयरित्या अचानक बेपत्ता का झाले, कुठे गेला याचा कसून शोध सुरू आहे.

कोण आहेत संजय लोटन पाटील ?

संजय लोटन पाटील ळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख शिंदे गटाचे प्रमुख असून गुलाबराव पाटील यांचे निकटर्तीय असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली . हे मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी आहेत. मात्र सध्या ते धुळे येथे वास्तव्याला होतो. ते अचानक गायब झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.