मंगळ आणि गुरु, हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मंगळाला साहस, ऊर्जा, बंधू-भावाशी संबंध, पराक्रम, रक्त, वीज आणि जमिनीचे कारक मानले जाते. तर गुरु ज्ञान, भाग्य, शिक्षण, विवाह, संतान, धर्म, पुण्य, ऐश्वर्य आणि धनाचे प्रतिनिधित्व करतात. द्रिक पंचांगानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या कन्या राशीत संचार करत आहे. गुरु मिथुन राशीत आहे. याशिवाय, 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांपासून मंगळ आणि गुरु एकमेकांशी 90° च्या कोनीय स्थितीत आहेत. ज्याला केंद्र दृष्टि योग असे म्हणतात.
दोन्ही शक्तिशाली आणि परस्परविरोधी स्वभावाच्या मंगळ आणि गुरु ग्रहांमधील या संयोगामुळे अनेक राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया, मंगळ-गुरुच्या ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे कोणत्या तीन राशींच्या जीवनात स्थिरता येईल.
‘केंद्र दृष्टि योगा’च्या निर्मितीमुळे वृश्चिक राशीच्या तरुणांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि मानसिक तणाव कमी होईल. भविष्यातील योजनांवर काम करणे व्यावसायिकांसाठी चांगले राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची निर्णयक्षमता मजबूत होईल आणि यश मिळवण्याचे नवे मार्ग सापडतील. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि घरात प्रेम व आपुलकीचे संतुलन राहील.
मंगळ-गुरुच्या ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता येईल. करिअरमध्ये प्रगती झाल्याने तरुणांचे मन प्रसन्न राहील. तसेच, आरोग्याची साथ मिळेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय किंवा दुकान आहे, त्यांना नफा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. या काळात नवीन प्रकल्पांमुळे अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बराच काळ अडकलेल्या कामांना गती मिळेल.
5 सप्टेंबर 2025 रोजी तयार होणाऱ्या मंगळ-गुरुच्या ‘केंद्र दृष्टि योगा’मुळे मेष राशीच्या लोकांना लाभ होईल. व्यवसायात यश मिळाल्याने व्यावसायिकांचे मन प्रसन्न राहील. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत नोकरी करणाऱ्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. जर कोणते कायदेशीर प्रकरण बराच काळ प्रलंबित असेल, तर त्यात दिलासा मिळेल. तसेच, कौटुंबिक जीवनात सुखद बदलांचा अनुभव होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)