श्रीमंत व्हायचंय का? इथे गुंतवणूक करा, जाणून घ्या
Tv9 Marathi September 06, 2025 09:45 AM

तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळाला कसा मिळेल, याचविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. गेल्या 10 वर्षांत प्रत्येक इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपीने दोन अंकी परतावा दिला आहे. 157 फंडांनी 10 वर्ष पूर्ण केली असून त्यापैकी 11 फंडांनी 20 टक्क्यांहून अधिक एक्सआयआरआर परतावा दिला असून स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंड अव्वल स्थानी आहेत. याविषय़ी जाणून घेऊया.

सर्वाधिक परतावा देणाऱ्या फंडांमध्ये क्वांट स्मॉल कॅप फंड पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने एक्सआयआरआर परतावा 24.54 टक्के (एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न) दिला आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड 23.01 टक्के परतावा देणारा दुसरा सर्वात मोठा फंड ठरला. त्याखालोखाल मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड (22.58 टक्के), इन्वेस्को इंडिया मिडकॅप फंड (21.29 टक्के), एडलवाइज मिडकॅप फंड (21.09 टक्के) आणि निप्पॉन इंडिया ग्रोथ मिडकॅप फंड (21.06 टक्के) या चार मिडकॅप फंड फंडांचा क्रमांक लागतो. एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ काळ गुंतवणूक केल्यास म्युच्युअल फंडांमध्ये चांगला परतावा देण्याची पूर्ण क्षमता असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

एसआयपी गुंतवणुकीवरील टॉप फंडांची कामगिरी

एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या एचडीएफसी स्मॉल कॅप फंड आणि एचडीएफसी मिड कॅप फंड या दोन फंडांनी गेल्या 10 वर्षांत अनुक्रमे 20.52 टक्के आणि 20.46 टक्के एक्सआयआरआर परतावा दिला आहे. क्वांट मिड कॅप फंडाने 10 वर्षांपूर्वी केलेल्या एसआयपीवर 19.66 टक्के एक्सआयआरआर परतावा दिला होता. त्यानंतर सर्वात मोठा फ्लेक्सी कॅप फंड येतो – पराग पारीख फ्लेक्सी कॅप फंड, जो एयूएम (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) वर आधारित सर्वात मोठा सक्रिय फंड मानला जातो. यात 19.48 टक्के एक्सआयआरआर परतावा मिळाला.

सर्वात जुना कॉन्ट्रा फंड 10 वर्षांच्या एसआयपीवर 19.41% एक्सआयआरआर परतावा

देशातील सर्वात मोठा आणि जुना कॉन्ट्रा फंड एसबीआय कॉन्ट्रा फंडाने याच कालावधीत 19.41 टक्के एक्सआयआरआर परतावा दिला. एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाने एसआयपी गुंतवणुकीवर 18.90 टक्के परतावा दिला. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड कॅप फंड ग्रोथ या दोन फंडांनी 18.31 टक्के आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंडाने 18.17 टक्के परतावा दिला. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या आदित्य बिर्ला एसएल फोकस्ड फंडाने 13.91 टक्के, आदित्य बिर्ला एसएल लार्ज कॅप फंडाने 13.87 टक्के आणि अ‍ॅक्सिस फोकस्ड फंडाने एसआयपीवर 10 वर्षांत 11.52 टक्के एक्सआयआरआर परतावा दिला. तर या यादीत शेवटचे स्थान मोतीलाल ओसवाल फोकस्ड फंडाने ठेवले होते, ज्याने 10.35 टक्के एक्सआयआरआर परतावा दिला.

सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांचा समावेश नाही

विश्लेषणात सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांचा समावेश आहे, परंतु सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांचा समावेश नाही. आम्ही केवळ नियमित आणि ग्रोथ ऑप्शन फंडांकडे पाहिले आहे आणि गेल्या 10 वर्षांच्या एसआयपी कामगिरीचे विश्लेषण केले आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.