मालवण येथे आरोग्य चिकित्सा
esakal September 06, 2025 02:45 PM

मालवण येथे
आरोग्य चिकित्सा
मालवण : हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल झाट्ये क्लिनीक यांच्या वतीने शनिवारी (ता.१३) दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री हनुमान मंदिर, सोमवार पेठ, मालवण येथे १८ वर्षाखालील मुलांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
------------
वेंगुर्लेत वारकऱ्यांना
भजन साहित्य वाटप
वेंगुर्ले : परिवर्तिनी एकादशीचे औचित्य साधून वेंगुर्ले येथे भाजपतर्फे वारकरी संप्रदायातील भक्तांना मृदुंग व टाळ यांसह भजन साहित्य भेट देण्यात आले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व जिल्हा परिषद सदस्य सुहास गवंडळकर उपस्थित होते.
------------
हरिनाम सप्ताहास
आसोली येथे प्रारंभ
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामदैवत श्री देव नारायणचा वार्षिक अखंड हरिनाम भागवत सप्ताह सोमवारपासून सुरू झाला आहे. ७ ला पौर्णिमेला दिंडी तर ८ ला दहीकाल्याने सांगता होणार आहे.
-----------
सिद्धी मांजरेकरला
संस्कृतमध्ये अव्वल
मालवण : गीतामाता संस्कृत प्रबोधिनी आयोजित संस्कृत संयुक्त मंदाकिनी परीक्षेत सिद्धी वसुंधरा मांजरेकर (शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर) हिने ५० पैकी ५० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिचा सत्कार केला.
-------------
भरड येथे
आरोग्य शिबीर
मालवण : श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल, झाट्ये क्लिनीक यांच्यावतीने बुधवारी (ता.१०) दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री दत्त मंदिर, भरड येथे लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
---------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.