Health Tips: जेवणात असे वापरा मीठ; कधीही होणार नाही बीपीचा त्रास
Marathi September 06, 2025 05:25 PM

एखादा पदार्थ बनवताना मीठ हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. मिठाशिवाय तो पदार्थ आळणी लागतो. मात्र असे असले तरी जास्त प्रमाणात मीठ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे स्वयंपाक करताना मीठ देखील प्रमाणात वापरले पाहिजे. जगातील आरोग्य संस्थेच्या मते, एका व्यक्तीने दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन केले पाहिजे, जे अंदाजे एक चमचे इतके असते. मात्र आपण दररोज जास्त मिठाचे सेवन करतो. त्यामुळे मिठाचा सुज्ञपणे वापर कसा करावा ते आपण पाहूया..

चव घेऊन मीठ घाला
आहारतज्ञ हे काही सोपे उपाय सांगतात. ज्यामुळे आपण पदार्थ बनवताना मिठाचा कमी वापर करू शकतो. नेहमी स्वयंपाक करताना त्या पदार्थाची चव घ्या. त्यानंतर मीठ घाला. यामुळे पदार्थात जास्त मीठ पडणार नाही.

मसाले आणि हर्ब्स
अधिक चवीसाठी मीठासोबत मसाले वापरले जाऊ शकतात. हळद, जिरे, धणे यासारखे भारतीय मसाले आणि तुळस, ओरेगॅनो, रोझमेरी, थायम हे हर्ब्स पदार्थाची चव आणखी वाढवतात. यामुळे कमी मीठ वापरूनही पदार्थ उत्तम बनतो.

लिंबू किंवा संत्र्याचा रस
लिंबू किंवा संत्र्याच्या रस पदार्थात घालावा. सॅलड, भाज्या, मासे किंवा चिकन सारख्या पदार्थांसाठी ही टीप बेस्ट आहे.

मीठ हळूहळू कमी करा
जर तुम्हाला जास्त मीठ खाण्याची सवय असेल, तर अचानक ते कमी केल्याने अन्नाची चव खराब होऊ शकते. म्हणून हळूहळू बदल करा आणि दर आठवड्याला थोडे थोडे मीठ कमी करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.