Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा धक्का, १५ वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या नेत्याने दिला राजीनामा
Saam TV September 06, 2025 07:45 PM
  • जळगावमध्ये ठाकरे गटाचे क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांनी राजीनामा दिला.

  • जगदीश पाटील यांनी शिवसेना पक्षातील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला.

  • १५ वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या पाटील यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या आधीच राज्यात ठिकठिकाणी इनकमिंग आणि आउटगोईंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु असताना जळगावमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जगदीश पाटील हे खडकेखुर्द येथील महाराणा प्रतापसिंद जगदीश पाटील शैक्षणिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षातील पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल, अजित पवारांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई

जगदीश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. काही वैयक्तिक कारणांमुळे पक्षातून बाहेर पडत असल्याचे राजीनाम्यात नमूद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. जगदीश पाटील यांनी राजीनामा देणे हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

जनता दलाच्या माध्यमातून जगदीश पाटील यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. माजी आमदार महेंद्र सिंह पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांचा प्रवास सुरु झाल्याचे म्हटले जाते. ते मागील पंधरा वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर जगदीश पाटील हे पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहिले होते.

Politics : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधी पक्षाने साथ सोडली, एनडीएमधूनही घेतली माघार
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.