पिंपरी, ता. ५ ः खडकी शिक्षण संस्थेच्या चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल-ज्युनिअर कॉलेजतर्फे गणेशोत्सवानिमित्त गणपतीची महाआरती करण्यात आली. संस्थेचे मानद अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस. के. जैन यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी सहशिक्षिका प्राची सुर्डीकर, अनुराधा आटोळे व विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी संस्थेचे राजेंद्र भुतडा, सुधीर फेणसे, कमलेश पंगुडवाले, महादेव नाईक उपस्थित होते. अॅड. जैन म्हणाले, "भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र जनजागृती आणि चांगल्या विचारांसाठी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वाचक बनावे आणि यशाची उत्तुंग शिखरे पार करावीत."
पर्यवेक्षक गिरीश ननावरे यांनी सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका उषा गोड्डे, ऋतुजा मोरे, रजनी सपकाळ यांनी विद्यार्थ्यांबरोबर गीत गायन केले. अमृता हुले यांनी तीर्थप्रसाद वाटप केले. मुख्याध्यापिका सरीता नायर व जयचंद्र नायर यांच्याहस्ते सत्यनारायणाची पूजा झाली. यावेळी उपमुख्याध्यापिका हेना शहा उपस्थित होत्या.
-----