गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक बदल झाले आहेत. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तर काही मालिका निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशात आता स्टार प्रवाहवरदेखील दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. रुपाली भोसले, कृतिका देव आणि चेतन वडनेरे यांची मुख्य भूमिका असणारी 'लपंडाव' ही मालिका लवकरच स्टार प्रवाहवर सुरू होणार आहेत. त्यासाठी आता एका मालिकेची वेळ बदलण्यात येतेय तर एक मालिका निरोप घेणार आहे.
स्टार प्रवाहवर लवकरच 'लपंडाव' ही मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी स्टार प्रवाहची 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका निरोप घेणार आहे. अवघ्या ९ महिन्यातच ही मालिका निरोप घेतेय. यापूर्वी या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्य याने मालिकेचा निरोप घेतला होता. आता काही दिवसातच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. ही मालिका २. ३० वाजता दाखवली जात हाती. मात्र आता त्याजागी 'शुभविवाह' ही मालिका दाखवण्यात येणार आहे. 'शुभविवाह' ही मालिका आधी २ वाजता प्रक्षेपित होत होती. आता ती २. ३० वाजता दाखवण्यात येणार आहे.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
या मालिकेची वेळ बदलल्याचा एक प्रोमो स्टार प्रवाहने शेअर केला आहे. यात आकाश आणि भूमी मालिकेच्या बदललेल्या वेळेबद्दल सांगत आहेत. मात्र यावर नेटकऱ्यांनी ही मालिका बंदच करा असं म्हंटल आहे. एकाने लिहिलं, 'फालतू सिरीयल आहे नाही दाखवलीत तरी चालेल' , दुसऱ्याने लिहिलं, 'कशाचा कशाशी मेळ नाही कशाला सुरू ठेवता. बंदच करा ही मालिका.' आणखी एकाने लिहिलं, 'विनाकारण उगाचच सुरू ठेवली आहे...तेच तेच बघून कंटाळा आला आता...' एकाने लिहिलं, 'म्हणजे रागिणी अजून खूप कारस्थान करणार सगळे पुरावे नष्ट करणार परत ती भूमी ला आणि आकाश त्रास देणार खरंच संपवा.' दुसऱ्याने लिहिलं, 'आम्हाला वाटलं होतं; भूमी, आकाश, संकर्षण, पौर्णिमा, अभिजित एकत्र येतील, आणि त्या रागिनीचं सत्य बाहेर येणार आणि मालिका संपेल.'
आता 'लपंडाव' मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
मुख्यमंत्रीही पोहोचले पाटेकरांचा गणपती पाहायला; नेमकं कुठे आहे नाना पाटेकरांचं फार्महाउस?