Latest Maharashtra News Updates : लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल
esakal September 06, 2025 03:45 PM
Buldhana : हाकेंवर गुन्हा दाखल करा, बुलढाण्यात पोलिसात तक्रार

Buldhana: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. बुलडाणा - लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालीय. हाकें विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक श्रीधर ढगे यांनी पोलिसात तक्रार दिलीय.

Chhatrapati Sambhajinagar : १५ फुट खड्डा खोदून काम का थांबवलं? पालकमंत्री शिरसाट अधिकाऱ्यांवर संतापले

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खड्ड्यात बुडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. जलवाहिनीसाठी १५ फूट खड्डा खोदल्यानंतर काम का थांबवलं? ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तो तुमचा मुलगा असता तर? असा प्रश्नही त्यांनी विचारला. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Pune Ganesh Visarjan Live : मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय.

Accident News : हलकी-मुरगोड मार्गावरील भीषण अपघातात दोघे जागीच ठार

बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील हलकी-मुरगोड मार्गावर गुरुवारी (ता. ४) रात्री झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. अनोळखी वाहनाने दुचाकीला ठोकरल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. महेश लमाणी (वय २०) व अप्पू लमाणी (२३, दोघे रा. हुलीकेरी तांडा, ता. सौंदत्ती) अशी त्यांची नावे आहेत.

Mumbai Rain : पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार, हवामान खात्याकडून आजही पावसाचा अंदाज

यंदा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरुये. मुंबईत सतत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबईत कालप्रमाणेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange : मराठवाड्यातील मराठे सरसकट कुणबी होणार - आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या ‘जीआर’च्या आधारावर मराठा सरसकट ओबीसी आरक्षणात जाणार नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरी हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठे सरसकट ओबीसी आरक्षणात जाणार आहेत, यात कोणताही संभ्रम नाही. तसेच, ‘जीआर’मध्ये दुरुस्ती सुचविल्यास ती करून मिळणार असल्याचे आश्वासनही राज्य सरकारने दिलेले आहे,’’ अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

Teacher Recruitment : राज्यात १८ हजार शिक्षकांची नियुक्ती करणार : मंत्री मधु बंगारप्पा

बंगळूर : राज्यात १८ हजार शिक्षकांची भरती केली जाईल. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभागाने विधान सौध बँक्वेट हॉलमध्ये आयोजित राज्यस्तरीय शिक्षकदिन समारंभ आणि राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

Maharashtra-Karnataka Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीची बुधवारी बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १०) तज्ज्ञ समितीची बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती समितीतर्फे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी तज्ज्ञ समितीची बैठक व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सुनावणीपूर्वी दुपारी तीन वाजता समिती कक्ष क्रमांक पाच, सातवा मजला मंत्रालय, मुख्य इमारतीमधील अतिथीगृहात बैठक होणार आहे. बैठक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष तथा लोकसभा सदस्य धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकसभा सदस्य, तथा सहअध्यक्ष तज्ज्ञ समिती धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Shaktipeeth Highway News : 'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या

सांगली : शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेवर घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. तसे निकाल प्रशासनाने दिले असून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला प्रति पाठविल्या आहेत. या निकालपत्राची होळी मंगळवारी (ता. ९) करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली.

Minister Atul Save : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

अंतरवाली सराटी (जि. जालना) : ओबीसी उपसमितीचे सदस्य, मंत्री अतुल सावे यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सोनियानगर- अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या सदस्यांनी पाचव्या दिवशी, शुक्रवारी उपोषण तूर्त स्थगित केले. लढा मात्र सुरूच राहील, असा निर्धार या सदस्यांनी व्यक्त केला.

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणीपातळी पावणेदोन फुटांनी उतरली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. दिवसभरात काही पडलेल्या हलक्या सरी वगळता कडकडीत ऊन पडले. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही घट झाल्याचे चित्र होते. पंचगंगेची पाणीपातळी जवळपास पावणेदोन फुटांनी उतरली. ती रात्री २० फूट नऊ इंच इतकी होती.

Khagras Lunar Eclipse : उद्या खग्रास चंद्रग्रहण, रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण सुरू होणार

पुणे : यंदा रविवारी (ता. ७) भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण सुरू होणार असून उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी ग्रहण संपेल. ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत.

Joe Biden News : अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर शस्त्रक्रिया

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या त्वचेतील कर्करोगाचा संसर्ग झालेल्या पेशी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कर्करोग झाल्याचे बायडेन यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते.

Anant Chaturdashi 2025 : राज्योत्सव म्हणून मान्यता मिळालेल्या गणेशोत्सवाची आज होणार सांगता; दिमाखदार मिरवणुकीसाठी मंडळे सज्ज

Latest Marathi Live Updates 6 September 2025 : राज्योत्सव म्हणून मान्यता मिळालेल्या आणि देश-विदेशांतही अत्यंत जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची आज (ता. ६) सांगता होणार आहे. लाडक्या गणरायाला दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यासाठी राज्याभरातील गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. तसेच यंदा रविवारी (ता. ७) भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण सुरू होणार असून उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी ग्रहण संपेल. ‘‘ओबीसी समाजाच्या वाट्याचे आरक्षण कोणालाही घेऊ दिले जाणार नाही. या आरक्षणावर कोणालाही गदा आणू दिली जाणार नाही. ओबीसी समाजबांधव हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही,’’ असा इशारा ओबीसी बांधवांनी बारामतीत दिला. ओबीसी उपसमितीचे सदस्य, मंत्री अतुल सावे यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सोनियानगर- अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या सदस्यांनी पाचव्या दिवशी, शुक्रवारी उपोषण तूर्त स्थगित केले. शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेवर घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. पुण्याच्या नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर या तरुणावर दोन ते चार जणांनी धावत जात गोळीबार केला. या घटनेत आयुष उर्फ गोविंद याचा मृत्यू झाला. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.