मुंबई- नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भिवंडीजवळ भरधाव ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातामध्ये बापलेकीचा जागीच मृत्यू झाला. देवदर्शनावरून घराकडे परत येत असताना हा अपघात झाला. हा अपघात इकता भीषण होता की, अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या बापलेकीने जागीच प्राण सोपडले. या अपघातामुळे भिवंडीमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकच्या चाकाखाली येऊन बापलेकीचा जागीच मृत्यू झाला. दोघेही देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
Mumbai Accident: लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना भयंकर अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यूपोलिसांनी सांगितले की, भिवंडी तालुक्यातील डोहोळे गावाजवळ मुंबई- नाशिक महामार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रॅकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. राजेश अधिकारी (वय ३९ वर्षे) आणि वेदिका अधिकारी (वय ११ वर्षे) या बापलेकीचा मृत्यू झाला. ते शहापूर तालुक्यातील सरळांबे गावातील रहिवासी होते.
Accident news : बसमधून उतरल्या, रस्ता ओलांडताना भरधाव कारने उडवले; सोबतच्या महिलेला वाचवताना गमावला जीवघटनेची माहिती मिळताच पडघा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गु्न्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. बापलेकीच्या मृत्यूमुळे सरळांबे गावावर शोककळा पसरली आहे. तर वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्यामुळे अधकारी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Washim Accident : रस्ता ओलांडताना सायकलस्वार मुलीला ट्रॅव्हल्सने उडवले; मुलीचा जागीच मृत्यू