swt55.jpg
89690
कुडाळ ः येथील बसस्थानकात आमदार नीलेश राणेंच्या उपस्थितीत मोबाईल चार्जिंग पॉईंट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
कुडाळ एसटी बसस्थानकात
‘मोबाईल चार्जिंग’चे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः शहरातील एसटी बस स्थानकावर आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याचा लोकार्पण सोहळा आमदार राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
एसटी प्रवाशांना वारंवार मोबाईल चार्जिंगच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन शहरप्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे आणि नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या माध्यमातून ही सुविधा उभारण्यात आली. या चार्जिंग पॉईंटचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, चेतन पडते, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, युवा सेनेचे वालावलकर आदी उपस्थित होते.